Mama I love you girl student scribbled on palm before suicide at delhi
Mama I love you girl student scribbled on palm before suicide at delhi 
देश

आई, मी हे जग सोडून जातेय...

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे, असे हातावर लिहून एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'इंद्रपुरी परिसरात राहात असलेली विद्यार्थिनी सातवीच्या वर्गात शिकत होती. 1 डिसेंबर रोजी तिने हातावर मजकूर लिहून आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने या घटनेबाबत शाळेतील दोन शिक्षकांना जबाबदार धरले आहे. माझ्या मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मित्रांनी मला सांगितलं की, शाळेतील दोन शिक्षक संपूर्ण वर्गासमोर तिला चारित्र्यहीन म्हणाले होते. ज्यामुळे ती दुखी होती, अशी माहिती मुलीच्या आईने दिली. मुलीची आई तीस हजारी न्यायालयात वकील असून तिथेच त्यांनी शेवटचे आपल्या मुलीला पाहिल्याचे सांगितले. याबाबत पुढील तपास सूरू आहे.'

मुलीच्या आईने पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, दुपारी चार वाजता घरी आल्यानंतर मुलीने पंख्याला गळफास घेतल्याचे लक्षात आले. यावेळी तिने हातावर मृत्युपूर्वी लिहीले होते की, आई, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे... मी हे जग सोडून जात आहे. माझ्या मुलीने एक शिक्षक रोज आपल्यावर ओरडत असल्याचे सांगितलं होते. शिवाय, इतर शिक्षकांसमोरही अपमान केला होता. यानंतर शाळेच्या बाथरुममध्ये जाऊन रडल्याचे मुलीने सांगितले होते. मला वारंवार शाळा बदलण्याचा आग्रह करत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर जाईल, याची मला कल्पना नव्हती. 20 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस असतो, वाढदिवसाला तिला बाहेर घेऊन जाणार होते. पण त्यापूर्वीच आम्हाला सोडून गेली.'

दरम्यान, शाळा प्रशासनाने चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन केली आहे. चौकशी समितीचा अहवाल दिल्ली पोलिसांकडे सादर करणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT