Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : आता मी रस्ते झाडू का? ममतांनी सरकारी अधिकारी, मंत्र्यांना झापले

अतिक्रमणे, अस्वच्छता, बेकायदा बांधकामे याबाबत जनतेच्या मनात असलेला संताप आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडून बाहेर पडला.

श्‍यामल रॉय

हावडा - अतिक्रमणे, अस्वच्छता, बेकायदा बांधकामे याबाबत जनतेच्या मनात असलेला संताप आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तोंडून बाहेर पडला. नबाना भागात दिलेल्या भेटीदरम्यान त्यांनी तेथील गैरकारभार आणि पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेवरून मंत्री, सरकारी अधिकारी, पोलिस या सर्वांना चांगलेच धारेवर धरले. रस्त्यांवरची अस्वच्छता पाहून तर, ‘आता मी रस्ते झाडू का?,’ असा संतप्त सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला.

ममता यांनी आज नबाना शहरातील सॉल्ट लेक आणि हावडा परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांना अनेक बेकायदा बांधकामे, पदपथांवर कब्जा मिळवलेले फेरीवाले आणि अस्वच्छ रस्ते दिसले. या सर्व प्रकारांना पाठीशी घालत असल्याबद्दल त्यांनी नंतर झालेल्या बैठकीत मंत्री, पोलिस आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. ७० मिनिटे चाललेल्या या बैठकीत ममतांनी अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले.

सॉल्ट लेक परिसरातील अतिक्रमणांना पाठीशी घालत असल्याबद्दल ममतांनी विधाननगर मतदारसंघाचे आमदार सुजित बोस यांचे नाव घेऊन त्यांना सुनावले. बोस यावेळी ममतांच्या शेजारच्याच खुर्चीत बसले होते. रस्त्यांवर प्रचंड प्रमाणात घाण दिसून आल्याचे सांगत ममतांनी ‘आता मी रस्ते झाडू का?,’ असा संताप व्यक्त केला.

दहा दिवसांची मुदत

अतिक्रमण प्रकारात मंत्री, खासदार, जिल्हाधिकारी, आमदार कोणीही दोषी आढळल्यास गय करू नका, अशा सक्त सूचना ममतांनी पोलिसांना दिल्या आहेत. दिलेल्या सूचनांवर कारवाई करण्यासाठी ममतांनी अधिकाऱ्यांना दहा दिवसांची मुदत दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT