देश

ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या वागत आहेत : विवेक ओबेरॉय

वृत्तसंस्था

मुंबई: ममता दीदी ‘सद्दाम हुसेन’सारख्या का वागत आहेत? असा प्रश्न बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याने केला आहे. भाजपचं समर्थन करत विवेकने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीकास्त्र सोडलं असून विवेक ओबेरॉयने ममता बॅनर्जी यांना इराकचा हुकूमशहा सद्दाम हुसेनची उपमा दिली.

पश्चिम बंगालमधील कोलकात्यात मंगळवारी (ता. 14) भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शो दरम्यान हिंसाचार आणि जाळपोळ झाली. भाजप कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यामुळे पश्चिम बंगाल ते दिल्लीपर्यंतचं राजकीय वातावरण तापलं आहे. 

यामध्ये विवेकने भाजपचे समर्थन करत ममता बॅनर्जी यांच्या ‘लोकतंत्र खतरे में है’ या विधानाच्या बातमीचा एक फोटो ट्वीट केला. त्यासोबत विवेकने लिहिले, “मला कळत नाही की, दीदींसारख्या आदरणीय महिला सद्दाम हुसेनसारख्या का वागत आहेत. दुर्दैव बघा, लोकशाहीला धोका आहे आणि तो स्वत: हुकूमशाह दीदींपासून आहे. आधी प्रियांका शर्मा आणि आता तजिंदर बग्गा. ही दीदीगिरी चालणार नाही. असे विवेकने ट्विट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT