Mamata Banerjee esakal
देश

Mamata Banerjee: ममता बॅनर्जी यांचा मोठा अपघात; डोक्याला गंभीर दुखापत, रुग्णालयात दाखल

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sandip Kapde

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की ममता बॅनर्जी त्यांच्या घराच्या आवारात चालत असताना पडल्या, यादरम्यान त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तृणमूलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता गुरुवारी कालीघाट गृहसंकुलात फेरफटका मारत होत्या. यावेळी त्या पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रक्तस्त्राव होऊ लागला. त्यांना तातडीने कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले. टीएमसीचे अखिल भारतीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी तेथे पोहोचले आहेत.

टीएमसीने आपल्या X हँडलवर ही माहिती दिली आहे. टीएमसीने लिहिले की, आमचे अध्यक्ष गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ममता यांचा एक फोटोही समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांच्या कपाळातून रक्त येत आहे. त्यांना कोलकाता येथील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या वर्षी जानेवारी महिन्यात देखील ममता यांचा अपघाताची झाला होता. त्यावेळी त्या वर्धमानहून कोलकात्याला परतत होत्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे ममता बॅनर्जी कारने परतत होत्या.

धुक्यामुळे कारचे ब्रेक लावताना ममता बॅनर्जी यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली होती. ममता यांच्या ताफ्यात दुसरी कार आल्याने चालकाला अचानक ब्रेक लावावा लागल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT