Mamata-Banerjee 
देश

जीवनाश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात आणा; ममता बॅनर्जी यांचे मोदी सरकारला पत्र 

पीटीआय

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जीवनावश्‍यक वस्तूंच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. बटाटा आणि कांद्याच्या यासारख्या जीवनावश्‍यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्याला पुन्हा अधिकार बहाल करावेत, असेही ममता बॅनर्जी यांनी आवाहन केले. 

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यापूर्वी नीट, जेईई आणि यूजीसी परीक्षेत हस्तक्षेप करावी या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. आता त्यांनी सामान्यांच्या प्रश्‍नांवर केंद्राला पत्र धाडले आहे. जीवनावश्‍यक वस्तूं कायद्यातील सुधारणांवरून त्यांनी केंद्र सरकारकडे नाराजी व्यक्त केली आहे. कायद्यातील सुधारणांमुळे धान्यसाठा करणाऱ्या व्यावसायिकांना नफाखोरीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. बटाटा आणि कांदा यासारख्या आवश्‍यक वस्तूंच्या व्यवहारात नफेखोरी केली जात आहे. परिणामी वस्तूंची किंमत वाढत असून त्याच्या किंमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. पंतप्रधानांना चार पानी पत्र लिहले असून की जीवनावश्‍यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले असून सामान्य नागरिक आर्थिक अडचणीत येत आहेत. केंद्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करत किंमत नियंत्रणात आणण्याबाबत हालचाली कराव्यात. अन्यथा कृषी वस्तूंचे उत्पादन, पुरवठा, वितरण, विक्री याबाबतचे अधिकार राज्यांना बहाल करावेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप यांच्याकडून ममता बॅनर्जी यांच्या मतांवर अद्याप कोणतिही प्रतिक्रिया आलेली नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सामान्य नागरिक महागाईखाली भरडला जात असताना पश्‍चिम बंगाल सरकार निमूटपणे पाहणार नाही. लोकांच्या आर्थिक अडचणी वाढत चालल्या असून ते सहन करण्यासारखे नाही. 
ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पत्रातील प्रमुख मुद्दे 
पंतप्रधानांना चार पानांचे पत्र 
नव्या सुधारणा कायद्यामुळे साठेबाजीला प्रोत्साहन 
कांदा, बटाटासारख्या वस्तूंवरील किंमतीच्या नियंत्रणाचे अधिकार राज्यांना द्या 
पश्‍चिम बंगाल सरकार स्वस्थ बसणार नाही 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत आज ठाकरेंचा मोर्चा; काँग्रेस-राष्ट्रवादीच्याही सहभागाची शक्यता

Electric Shock Farmer: दुष्काळात भातपीक वाचवण्याची धडपड ठरली जीवघेणी; शेतात पाणी देताना वीजप्रवाहाच्या संपर्कात येऊन शेतकऱ्याचा मृत्यू

Horoscope 2027: २०२७ ठरणार खास! नोकरी, व्यवसाय अन् पैशांच्या बाबतीत मिळू शकतात मोठ्या संधी; ‘या’ ३ राशींचं नशीब चमकणार म्हणे

Sunetra Pawar: ‘स्वतःच्या कर्तृत्वावर निवडणूक लढवा, अजितदादांचं नाव वापरू नका’; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना टोला

Maharashtra Monsoon Withdrawal : निम्म्या राज्यातून परतला पाऊस! मॉन्सूनच्या माघारीस पोषक स्थिती असल्याने प्रवास वेगाने सुरू, जाणून घ्या तुमच्या भागातील स्थिती

SCROLL FOR NEXT