rakesh roshan and rakesh sharma and mamata banerjee 
देश

Chandrayaan-3 : ममता बॅनर्जींनी अभिनेते राकेश रोशन यांनाच ठरवलं पहिले अंतराळवीर

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरल्याच्या ऐतिहासिक यशाचा आनंद संपूर्ण भारतात साजरा करण्यात आला. त्याचवेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची एक चूक नेटकऱ्यांसाठी विनोदाचा मुद्दा बनली आहे.

चांद्रयान-३ लँडर चंद्रावर पोहोचण्यापूर्वी कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी चुकून भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा यांच्याऐवजी बॉलिवूड अभिनेता-चित्रपट निर्माते राकेश रोशन यांचा उल्लेख केला. त्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय बनला होता.

पश्चिम बंगालच्या जनतेच्या वतीने मी इस्रोचे आधीच अभिनंदन करते. शास्त्रज्ञांना श्रेय मिळाले पाहिजे, श्रेय देशाला मिळाले पाहिजे. राकेश रोशन चंद्रावर उतरले तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना तिथून भारत कसा दिसतो असा प्रश्न विचारला होता, असं ममता यांनी म्हटलं. ममता यांची ही चूक सोशल मीडियावर व्हायरल झाली.

भारतीय वायुसेनेचे वैमानिक राकेश शर्मा हे १९८४ मध्ये सोव्हिएत युनियनच्या सोयुज टी-११ मोहिमेचा भाग म्हणून अंतराळात जाणारे पहिले भारतीय ठरले होते. तेव्हा इंदिरा गांधींनी राकेश शर्मा यांना विचारले, "अंतराळातून भारत कसा दिसतो?" त्यावर कवी इक्बाल यांच्या ओळींचा संदर्भ देत राकेश शर्मा म्हणाले होते, 'सारे जहाँ से अच्छा' (संपूर्ण जगापेक्षा चांगले).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CMO Office: देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील कार्यालयाचा पत्ता बदलणार! आता 'ही' इमारत सत्तेचे नवे केंद्र बनणार; सरकारचा मोठा निर्णय

Smart Meter Protest: उरुळी कांचनमध्ये स्मार्ट मीटरविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे ठिय्या आंदोलन, महावितरणला लेखी निवेदन

KDMC: केडीएमसी आयुक्तांची धडक कारवाई, दोन कर्मचाऱ्यांचे निलंबन; नेमके कारण काय?

"दोनशे लोकांचं जेवण आणि घाईघाईत बुकिंग", 'सीजेपी'च्या व्हायरल व्हिडीओवर हॉटेल व्यवस्थापनाची प्रतिक्रिया

Pakistan Cricket: आधी वेस्ट इंडिजने जिरवली, आता ICC ने कारवाई केली! पाकिस्तानच्या दोन गोलंदाजांना झाली शिक्षा...

SCROLL FOR NEXT