Mamata Banerjee Team eSakal
देश

विजयानंतर ममतांची तिखट प्रतिक्रीया; भाजपला लगावला टोला

ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदार संघातील पोटनिवडणुकीत विजय मिळवला.

सुधीर काकडे

बंगालमध्ये निवडणुका सुरू झाल्यापासून केंद्र सरकारने आम्हाला सत्तेवरून हटवण्यासाठी कट रचले. आपण निवडणूक लढवू नये कारस्थान केले त्यात आपल्या पायाला दुखापत झाली. मात्र 6 महिन्यांच्या आत निवडणुका आयोजित केल्याबद्दल निवडणुक आयोगाला तसेच मतदान केल्याबद्दल आपण जनतेचे आभारी आहोत, अशी तिखट प्रतिक्रीया देत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला टोला लगावला.

पश्चिम बंगालमध्ये एप्रिल २०२१ मध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजप आणि तृणमुल काँग्रसे या दोन्ही पक्षांत मोठ्या चुरशीची लढाई पाहायला मिळाली होती. या निवडणुकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पराभव स्विकारावा लागला होता. मोठ्या प्रमाणात झालेल्या भाजप आणि तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधील वादामुळे निवडणुकीनंतर बंगालध्ये मोठा हिंसाचार झाला होता.

दरम्यान, बॅनर्जी यांनी आज भवानीपूर मतदार संघात विधान सभा पोटनिवडणुकीत विजय निश्चित झाला आहे. भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांच्या विरोधात ५८,३८९ मतांनी आघाडी मिळवली आहे. भारतीय जनता पक्ष आणि तृणमुल काँग्रेस या दोन्हीही पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती. यावर्षी मार्च मध्ये झालेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभव मिळाला होता. भाजपचे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींपेक्षा जास्त मतं मिळवत त्यांना पराभुत केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : चाकणमध्ये भाईगिरीचा थरार! फक्त हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बसची तोडफोड

60 कोटींचा बंगला, आलिशान गाड्या, लंडनमध्ये घर; तब्बल 'इतक्या' कोटींची आहे अजय देवगणची संपत्ती, आकडा ऐकून थक्क व्हाल

Honey Trap Case : पाकिस्तानी महिला हेराच्या जाळ्यात अडकला नौदलाचा जवान

श्री तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू; १० ऑक्टोबरपर्यंत मिळणार नाही दर्शन! जाणून घ्या 'या' प्रथेमागील नेमकं कारण...

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेशी संपर्क असल्याच्या आरोपावरून गुवाहाटीत तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT