Mamata-Banerjee 
देश

निती आयोगाच्या बैठकीला ममतांची दांडी

वृत्तसंस्था

कोलकाता : राज्यांच्या नियोजन आराखड्यांना मदत करण्याचे अधिकार निती आयोगाला नाहीत, त्यामुळे या आयोगाच्या 15 जून रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्यात काहीही अर्थ नाही, असे पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. अशा प्रकारच्या 'निष्फळ' बैठकीला आपण उपस्थित राहणार नाही, असेही बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

निती आयोगाला कुठलेही अर्थविषयक अधिकार नाहीत. तसेच, राज्यांच्या नियोजन आराखड्याला मदत करण्याचाही अधिकार या आयोगाला नाही. त्यामुळे कुठलेही आर्थिक अधिकार नसलेल्या निती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यात मला स्वारस्य नाही, असे बॅनर्जी यांनी पत्रात म्हटले आहे.

सहकार्यात्मक संघराज्याची संकल्पना खोल रुजविण्यासाठी केंद्र सरकारने आपले लक्ष आंतरराज्य परिषदेवर (आयएससी) केंद्रित करण्याची आवश्‍यकता आहे, अशी सूचनाही बॅनर्जी यांनी पत्रात केली आहे. आयएसीची सूचना मी सुरवातीलाच मांडली होती. मागील साडेचार वर्षांतील निती आयोगाबाबतचा अनुभव पाहता आवश्‍यक त्या बदलांसह आयएसीवर भर देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 

निती आयोगाच्या कार्यकारी मंडळाची 15 जून रोजी बैठक होत असून, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे. देशाच्या विकासासंबंधी या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel War मुळे भारतात दारूचा दुष्काळ? उन्हाळ्यात थंड बिअरही मिळणार नाही? उत्पादनावर काय परिणाम होणार

IPL 2026: 'रोहित शर्मा डगआऊटमधून २० ओव्हर पाहू शकत नाही, त्याला...', माजी क्रिकेटरचा मुंबई इंडियन्सला स्पष्ट सल्ला

Gudhipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : पुण्यात पिरंगुट घाटात कार दरीत कोसळली

Kolhapur Headmaster Tragedy : निलंबनाचे नैराश्य मुख्याध्यापकाने थेट आंब्याच्या झाडाला घेतला गळफास, कोल्हापुरातील घटना

SCROLL FOR NEXT