Mamta Banerjee Sakal
देश

west Bengal Rape case : ममता बॅनर्जींच्या वक्तव्यावरुन वादंग

अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते, हे शेजाऱ्यांनाही माहीत होते, असं वक्तव्य त्यांनी केलंय

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम बंगालमधील नादीया जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर ममता बॅनर्जी यांच्यावर मोठ्या प्रमाणात राजकीय टिका झाली. त्याला प्रत्युत्तर देताना बॅनर्जीने हे वक्तव्य केलंय. (Mamata Banerjee's shocking remark on Hanskhali gangrape case)

मात्र ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडीयावर अनेक जणांनी, हे अतिशय असंवेदवशील वक्तव्य असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध सिनेमा निर्माते श्रीजीत मुखर्जी यांनी हे विधान आक्षेपार्ह आणि असंवेदनशील असल्याची पोस्ट फेसबुकवर लिहीलीय. तर भाजपाचे नेते अमित मालविय यांनी देखील त्यांच्या वक्तव्याला धक्कादायक आणि असंवेदनशील म्हंटलंय.

या प्रकरणात ममता बॅनर्जी यांनी, "खरचं बलात्कार झाला होता का, पोस्टमार्टम आधीच अत्यंसंस्कार का करण्यात आलं' अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते हे शेजाऱ्यांनाही माहीत होते, असं वादग्रस्त विधान केलंय, नादीया जिल्ह्यातील ‘हंसखली’ येथे अल्पवयीन मुलीवर TMC नेत्याच्या वाढदिवसाच्या पार्टीत सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर पीडीतेचा मृत्यू झाला.

ममता बॅनर्जींनी पोलिस या संदर्भात निष्पक्षरित्या कारवाई करत असल्याचं देखील सांगितलंय. हंसखलीच्या TMC नेत्याच्या २१ वर्षीय मुलगा हा प्रमुख आरोपी आहे. 5 एप्रिल रोजी पिडीता ही वाढदिवसाच्या पार्टीत गेली होती, त्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर या पिडीतेवर अंत्यसंस्कार देखील करण्यात आले, स्थानिक टिएमसी कार्यकर्त्यांनी अंत्यसंस्कार करण्यासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप पीडीतेच्या आईने केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S.T. Workers: दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा इशारा; मशाल मोर्चा निघणार, नेमक्या मागण्या काय?

Mayawati on Bihar Election : बिहार निवडणुकीसाठी मायावतींनी घेतला मोठा निर्णय ; ट्वीटद्वारे 'बसपा'ची भूमिका जाहीर!

Pune News : महापालिका निवडणुकीसाठी ५ हजार मतदान केंद्र

Pune Water Close : पुणे शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद

जगातला सगळ्यात मोठा डॉन; 'मुळशी पॅटर्न'प्रमाणेच बकासूर झाला अन् अमेरिकेच्या जेलमध्ये तडफडून मेला

SCROLL FOR NEXT