Mamata Banerjee ANI
देश

प. बंगालमध्ये तृणमुलचा चार जागांवर विजय; ममतांची घोषणा

विधानसभेनंतर पोटनिवडणुकीतही भाजपचा मोठा पराभव

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये चार जागांच्या पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी सुरु आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पक्षानं सर्व चार जागांवर विजय मिळवला असल्याचं मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी जाहीर केलं आहे. दिनहाटा, शांतीपूर, गोसाबा आणि खरदा या चार जागांवर पोटनिवडणूक पार पडली होती.

देशातील १४ राज्यांमधील ३ लोकसभा आणि २९ विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. आत्तापर्यंतच्या ताज्या कलांनुसार, मध्य प्रदेश, आसाम तेलंगाणा येथे भाजप आघाडीवर आहे. तर हिमाचल प्रदेश आणि राजस्थानात काँग्रेसला बढत मिळाली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये चार जागांवर तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. या जागांवर विजय मिळवल्याचं तृणमूलनं जाहीर केलेलं असलं तरी अद्याप निवडणूक आयोगानं याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

दरम्यान, तृणमूलचे खासदार देरेक ओबरिअन यांनी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्विट केलं असून यामध्ये तृणमूल काँग्रेसनं ४ जागांवर मोठा विजय मिळवल्याचं जाहीर केलं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, या चारही जागांसाठी तृणमूल पहिल्या क्रमांकावर तर दुसऱ्या आणि तिसऱ्या जागांवर भाजप आणि सीपीआयएम आहे. भाजपनं गृहराज्यमंत्र्यांची जागा गमावली आहे. दिनहाटा येथे पक्षानं दीड लाखांचा लीड मिळवला आहे. आता अमित शहा पुढच्या दिवाळीपर्यंत बंगालला येणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT