तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी  ट्विटरवर पोस्ट केलेले पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे रुग्णालयातील छायाचित्र.
तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेले पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे रुग्णालयातील छायाचित्र. 
देश

भाजपकडून ‘सीबीआय’ चौकशीची मागणी; ममतांचा बनाव असल्याचा आरोप

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकता/नवी दिल्ली - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (वय ६६) यांच्या पायाला  व गळ्याला दुखापत झाल्यानंतर यामागे भाजपचे कारस्थान असल्याचा दावा त्यांनी काल केला होता. भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू झाला आहे. या घटनेची ‘सीबीआय’ चौकशी करण्याची मागणी भाजप केली आहे. निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात ‘तृणमूल’ने पक्षाध्यक्षांच्या जीविताला धोका पोचवण्याचे कारस्थान यामागे असल्याचा आरोप केला आहे तर या हल्ल्याबाबत ममता बॅनर्जी खोटे बोलत असून याचे व्हिडिओ चित्रीकरण देण्याची मागणी भाजपने केली आहे. 

राज्य सरकारशी चर्चेविना निवडणूक आयोगाने बंगालमधील पोलिस महासंचालकांना पदावरून हटविण्यात आल्याच्या केल्याच्या २४ तासांत मुख्यमंत्र्याच्या जीविताला हानी पोचविण्यासाठी हा भ्याड हल्ला करण्यात आला, असा आरोप ‘टीएमसी’ने केला आहे. संबंधित पोलिस प्रमुखांविरोधात भाजपने केलेल्या तक्रारी आणि ममतांना दुखापत झाली त्या वेळी तेथे पोलिसांची अनुपस्थिती या दोन घटनांमध्ये परस्परसंबंध असल्याचा व नंदिग्राममध्ये शेजारील शहरांतून काही समाजविघातक घटनांच्या हालचाली सुरू असल्याची माहिती समजली होती, असा दावा ‘तृणमूल’ने केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बंगाली जनतेची ताकद दिसेल
ममता बॅनर्जी यांचे भाचे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी आज ममतादीदींचे कोलकतामधील रुग्णालयातील छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचबरोबर ‘बंगाली जनतेची ताकद २ मे रोजी पाहण्याची तयारी करा,’ असे आव्हानही भाजपला दिले. 

पराभवाच्या निराशेतून बनाव
भाजपनेही ट्विट करीत ‘निवडणुकीत पराभव होणार असल्याचे कळून चुकल्याने घोर निराशेत मुख्यमंत्री असा बनाव करीत आहेत, ’ असा जोरदार प्रहार करीत ममतांवर टीका केली. ममता बॅनर्जी यांच्या तथाकथित ‘हल्ल्या’च्या आरोपाला पुष्टी देणारा एकही प्रत्यक्षदर्शी नाही. उलट नंदीग्रामवरील लोकांना दोषी ठरविणाऱ्या आणि त्यांची नाचक्की करणाऱ्या ममतांबद्दल तेथील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटरवर ‘ममता बॅनर्जी’ ट्रेंड
पश्‍चिम बंगालमध्ये कालपासून घडणाऱ्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर ट्विटरवर ‘ममता बॅनर्जी’ ट्रेंड जोरात होता. काही जणांच्या मते हे सर्व नाटक आहे. निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी जे सांगितले तेच दीदींने केले, असे एका ट्विटर हँडलवर म्हटले आहे. या ‘नाट्या’वर टीका करीत अन्य एकाने म्हटले आहे की भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मोटारीवर दगडफेक झाली ते ‘नाटक’ होते. तेजस्वी सूर्या यांच्या सभेत गावठी बाँबचा हल्ला झाला तर तेही नाटक होते; पण ममता दीदींना केवळ ‘धक्का’ लागला तर ते सत्य आहे., ही हुकुमशाही आहे.

व्हिडिओ चित्रण जाहीर करा - भाजप
ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केलेला हल्ल्याचा आरोप हा संशयास्पद व अवमानकारक असल्याचे भाजपने निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. हे आरोप अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेवर यानिमित्त प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ सुरक्षा अधिकारी आणि हजारो पोलिस कर्मचारी उपस्थित असूनही ही घटना कशी घडली?, असा सवाल करीत याची व्यापक चौकशी करण्याची मागणी पक्षाने केली आहे. तसेच याचे व्हिडिओ चित्रण सर्वांसमोर यावे, असा आग्रहही भाजपने धरला आहे.  दरम्यान, निवडणूक आयोगानेही तृणमूलच्या पत्राला उत्तर दिले असून ममतांना झालेल्या दुखापतीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. मात्र, राज्यातील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगाची नाही, असेही आयोगाने स्पष्ट करत प्रकरणाची चौकशी होण्याची गरज व्यक्त केली आहे.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Neeraj Chopra Injured : भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना धक्का? पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्राला झाली दुखापत

पुण्यातील अधिकाऱ्याच्या पत्राने CM शिंदेचं टेन्शन वाढलं!, मंत्र्यावर कारवाई करणार का? काय आहे प्रकरण?

Hardik Pandya Natasa Stankovic Divorce : आईबापाची भांडणं अन् काकाच्या कडेवर हार्दिकचा लेक; पत्नी नताशाने केली कमेंट...

बारावीत 60 टक्के पडले म्हणून...दीड तासात उडवले 48 हजार! पोलीस तपासात धक्कादायक माहिती

Vilasrao Deshmukh: विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश भावूक; शेअर केली पोस्ट

SCROLL FOR NEXT