Shashi Tharoor
Shashi Tharoor Sakal
देश

Shashi Tharoor English : Meme झाले खरे! शशी थरुरांच्या कार्यक्रमात तरुण थेट डिक्शनरीच घेऊन पोहोचला...

सकाळ डिजिटल टीम

Shashi Tharoor English: काँग्रेस खासदार शशी थरुर यांचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व हा सातत्याने चर्चेचा विषय ठरत असतो. शशी थरुर अनेकदा आपल्या भाषणांमधून, साहित्यातून इंग्रजी भाषेतले नवनवीन शब्द समोर आणत असतात. अनेकदा ते मीम्सचा विषयही झाले आहेत.

आता पुन्हा एकदा शशी थरुर चर्चेत आले आहेत. त्यांच्या एका कार्यक्रमाला एक तरुण चक्क डिक्शनरी घेऊन गेला आहे. या तरुणाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

शशी थरुर यांनी लुंगलेंग शो नावाच्या एका टॉक शोमध्ये भाग घेतला होता. या शो नागालँडमध्ये होता. आर लुंगलेंग यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये एक माणूस डिक्शनरी सोबत घेऊन आला होता. लुंगलेंग यांनीच हा व्हिडीओ शेअर केला आहे.

थरुर यांच्या शब्दांचे अर्थ लावण्यासाठी ही व्यक्ती डिक्शनरी घेऊन आल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. अनेकदा शशी थरुर यांच्या इंग्रजीच्या ज्ञानावरुन मीम्सही होतात. या प्रकारामुळे हे मीम्सच जणू खरं ठरल्याची भावनाही नेटकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Labour Day : 1 मे ला कामगार दिवस का म्हटले जाते? काय आहे यामागचा इतिहास? वाचा सविस्तर

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! पीक कर्जाच्या पुनर्गठनासाठी ऑगस्टपर्यंत मुदत; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सवलत, पण शेतकऱ्यांची संमती पुनर्गठन आवश्यक

Maharashtra Day 2024: महाराष्ट्र दिनानिमित्त द्या खास अंदाजात मराठमोळ्या शुभेच्छा

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT