Abusing Minor Girl 
देश

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

Man Caught Abusing Minor Girl : एका अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एका अत्यंत धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गर्दीच्या ठिकाणी अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन करत असल्याचं दिसत आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून आरोपी व्यक्तीविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे. 'फ्री प्रेस जर्नल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सदर बाझारमधील हा धक्कादायक प्रकार आहे. एक व्यक्ती गर्दीचा फायदा घेऊन लाजिरवाणे कृत्य करताना दिसत आहे. व्हिडिओमधील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे. व्यक्तीची अद्याप ओळख होऊ शकलेली नाही. शिवाय पोलिसांनी याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं समजतंय.

व्यक्ती गर्दीमध्ये एका तरुणीच्या मागे जाऊन उभारतो आणि तिच्यासोबत अश्लील वर्तन करतो. व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसत आहे. पीडित मुलगी या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिन्न असल्याचं देखील दिसत आहे. बाजारमध्ये असलेल्या काही लोकांना ही गोष्ट लक्षात येते असंही व्हिडिओ पाहून वाटतं, पण पुढे काय होतं हे व्हिडिओमध्ये स्पष्ट नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे. पोलिसांनी तपास देखील सुरु केला आहे. पण, अद्याप आरोपीची ओळख होऊ शकलेली नाही, तसेच तो सापडलेला देखील नाही. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. आरोपीला पकडा आणि याला कठोरातील कठोर शिक्षा द्या अशी मागणी लोक करु लागले आहेत.

एका युझरने व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की, 'गर्दीचा फायदा घेऊन एक व्यक्ती अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन करत आहे. दिल्लीच्या लोकांनो तुम्हाला हा व्यक्ती दिसला तर त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका. बाकी तुम्ही सुज्ञ आहात.' दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं की, 'असे बलात्कारी लोक सहज कधीच सापडत नाही. व्हिडिओ व्हायरल करा, म्हणजे या नराधमाला पकडता येईल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सोन्याचे भाव भडकले! अवघ्या 10 तासांत 14 हजारांची वाढ; काय आहे ताजा भाव?

Baramati Plane Crash: बारामतीमध्ये पुन्हा विमान दुर्घटना; प्रशिक्षण विमान शेतात कोसळले, शेतकरी महिलांनी पाहिला थरार..

'अरे हा तर सेम मकरंद अनासपुरे सारखं करतोय' साईराज आणि पूर्वा शिंदेचा Viral Video, नेटकरी म्हणाले...

Zero Shadow Day 2026: पुण्यात आज गायब होणार सावली; काय आहे ‘झिरो शॅडो डे’चा अनोखा प्रकार? जाणून घ्या भन्नाट विज्ञान

Scuba Diving World Record: सागराच्या पोटात फडकला ‘तिरंगा’; जागतिक विक्रमाची नोंद, मालवणच्या सुपुत्राचे नेतृत्व, तारकर्लीच्या समुद्रात गिरवले धडे!

SCROLL FOR NEXT