Uttar Pradesh 
देश

योगींच्या गोरखपूर मंदिरात चाकूसह घुसणारा आरोपी IITतून इंजिनिअर; दोन जखमी

सकाळ डिजिटल टीम

गोरखपूर: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं निवास अर्थात गोरखनाथ मंदिरामध्ये काल रविवारी एका व्यक्तीने धारदार हत्यारासह आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, या झटापटीमध्ये दोन जण जबर जखमी झाले आहेत. हा हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पकडल्यानंतर पोलिस त्याची कसून चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे, या संपूर्ण घटनाक्रमानंतर पोलिसांनी गोरखनाथ मंदिरामधील संरक्षण वाढवण्यात आलं आहे. (Uttar Pradesh)

पोलिसांनी चौकशीनंतर या आरोपीचं नाव मोहम्मद मुर्तजा अब्बासी असल्याचं सांगितंलय. तो गोरखपूरच्या सिव्हील लाईन्स भागात राहणारा आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून केमिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्याची माहिती आहे.

अधिक चौकशी केल्याअंती समजलं की, हा आरोपी पेशाने इंजिनिअरअसून ऑक्टोबर 2020 पर्यंत तो मुंबईमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत रहायचा. त्याच्या वडिलांनी सांगितंलय की, त्यांच्या मुलाची मानसिक अवस्था ढासळलेली असून काल सायंकाळपासूनच ते त्याचा शोध घेत आहेत. सध्या तपासासाठी मुर्तजाच्या वडिलांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या संपूर्ण प्रकरणी गोरखपूरचे एडीजी अखिल कुमार यांचं म्हणणं आहे की, पोलिस या घटनेच्या प्रत्येक बाबीवर बारकाईने तपास करतील. (Uttar Pradesh)

काल रात्री मुर्तजाने धारदार चाकूसह गोरखनाथ मंदिर परिसरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. तो अल्ला-हू-अकबरच्या घोषणा देत मंदिराच्या गेटमध्ये घुसला. या तरुणाला पकडण्यासाठी तिथले सुरक्षारक्षक गोपाल कुमार गौड आणि अनिल कुमार गेले असता ते जखमी झाले. त्यांना तातडीने गोरखनाथ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांना घटनास्थळी एक बॅगही मिळाली आहे, ज्यामध्ये लॅपटॉप, पॅन कार्ड आणि एअरलाईनचे एक तिकीट देखील मिळाले आहे. या आरोपीची पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याची नोकरीही गेली आहे. यामुळे डिप्रेशन आलं असून तो कित्येक रात्री झोपला नसल्याचीही माहिती आहे. त्याला कुणीतरी गोळीने मारुन टाकावं, अशी त्याची इच्छा होती, म्हणूनच त्याने पोलिसांवर हल्ला केला होता. (Uttar Pradesh)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT