vaccination File photo
देश

गुजरातमध्ये 3 वर्षांपूर्वी मृत व्यक्तीला कोरोनाची लस

कार्तिक पुजारी

कोरोनावर मात (Covid vaccine) करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण (Gujarat ) हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

गांधीनगर- कोरोनावर मात (Covid vaccine) करण्यासाठी देशभरात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी लसीकरण (Gujarat ) हाच प्रमुख पर्याय असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. लस घेणे लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. कारण यामुळे विषाणूपासूनचा धोका कमी होतो. पण, गुजरातमध्ये तीन वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लशीचा लाभ देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कुटुंबियांना धक्का बसला आहे. (Man dead 3 years ago gets Covid vaccine in Gujarat not a lone case Hardasbhai Karingiya)

हरदेसभाई करिंगिया Hardasbhai Karingiya यांचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. पण, त्यांच्या कुटुंबियांना 3 मे रोजी हरदेसभाई करिंगिया यांना लस देण्यात आल्याचा मेसेज मिळाला. मोबाईल क्रमांक हरदेसभाई करिंगिया यांच्या नावावर रेजिस्टर होता. पण, 2018 साली मृत झालेल्या हरदेसभाई यांना लस देण्यात आल्याचा मेसेज आला. यामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. शिवाय त्यांच्या नावावरचे लस घेतल्याचे सर्टिफिकेटही उपलब्ध झाले आहेत. हरदेसभाई यांचे कुटुंबीय उपलेटाचे रहिवाशी आहेत.

आम्हाला समजण्यास जड जातंय की हे कसं शक्य आहे, असं हरदेसभाई यांचे नातू अरविंद करिंगिया म्हणाले. यावेळी त्यांनी हरदेसभाई यांचे डेथ सर्टिफिकेटही दाखवले. यामुळे कुटुंबियांना मानसिक त्रास झाल्याचं ते म्हणाले आहेत. त्यांना लस देण्यात आल्याचा मेसेज कसा प्राप्त झाला, हे आम्हाला कळायला हवं, असं अरविंद करिंगिया म्हणाले.

दरम्यान, राज्यात कोरोना लशींचा तुटवडा असताना असा प्रकार समोर आला आहे. शिवाय गुजरातमध्ये मृत व्यक्तीला लशीचा लाभ देण्यात आल्याची ही पहिली घटना नाही. अशा प्रकारचा अनुभव गुजरातमधील इतर काही कुटुंबियांना आला आहे. गुजरातमध्ये आतापर्यंत 10 पेक्षा अधिक प्रकरणांमध्ये मृतांना लशीचा लाभ देण्यात आल्याचं समोर आलंय. 'इंडिया टूडे'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी खुशखबर! मध्य रेल्वेवर १५ डब्यांच्या लोकलच्या आणखी १० फेऱ्या, १२ डब्यांच्या लोकलचे १५ डब्यांत रूपांतर

FDA Crime : पुणे शहरातील प्रसिद्ध गोल्‍डन बेकरीसह दहा बेकरी, रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; अस्वच्छतेप्रकरणी एफडीएची कारवाई

Garfield Sobers: क्रिकेटच्या इतिहासातील महान ऑलराउंडर काळाच्या पडद्याआड! गॅरी सोबर्स यांचं निधन; क्रीडाजगत शोकसागरात

Pune News : जप्त गुळाचे करायचे काय? गूळ उत्पादकांचा सवाल, जवळपास ४०० गुऱ्हाळांवर परिणाम

Amritsar Express: अमृतसर एक्स्प्रेसच्या डब्याखाली सापडला मानवी पाय; सीएसएमटी रेल्वे यार्डमधील घटना, रेल्वे पोलिसांना वेगळाच संशय

SCROLL FOR NEXT