Crime News 
देश

Crime News : एकतर्फी प्रेमात मागे लागलेल्या तरुणाला मामेबहिणीने जिवंत जाळलं! घटनेमुळे खळबळ

दिल्लीतील वजीराबाद येथे एका २३ वर्षीय तरुणाला एका महिनेने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

दिल्लीतील वजीराबाद येथे एका २३ वर्षीय तरुणाला एका महिनेने पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान घटनेचा माहिती मिळताचा पोलीसांनी कारावाईला सुरूवात केली आहे.

पोलिसांनी शनिवारी माहिती दिली की, वजीराबाद परिसरता एका २३ वर्षीय तरुणाला एका महिलेने पेटवल्यानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती गुरूवारी मिळाली. पोलिसांचे पथक पोहचले तोपर्यंत तरुणाला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या प्राथमिक तपासात एकतर्फी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले असून, मृताने तरुणीला लग्नाची मागणी घतली होती. मात्र मुलीने लग्नाला नकार दिला होता.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाने रुग्णालयात मृत्यूपूर्वी दिलेल्या निवेदनात आरोप केला की मुलीने त्याला तिच्या घरी बोलावले आणि त्याच्यावर काही ज्वलनशील पदार्थ टाकून आग वावली, घटनेत तरुण ७५ टक्के भाजाला होता आणि शुक्रवारी सकाळी त्याच्या मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार तरुण हा त्या मुलीचा नातेवाईक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा अजून तपास सुरू असून पीडित तरुणाने दिलेल्या माहितीमध्ये काही विरोधाभासी बाबी समोर आल्या आहेत. तो एक ऑनलाइन फुड डिलीव्हरी कंपनीत काम करत होता. आम्ही आयपीसीचे कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आङे. मात्र शुक्रवारी त्या तरुणाचा मृत्यू झाला. घटनास्थळाची फॉरेंसिक तपासणी करणअयात आली आणि कपडे आणि मोबाइल फोन पुरावा म्हणून जब्त करण्यात आला आहे.

तसेच घटनास्थळावरील आणि त्याच्या जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज देखील तपासले जात आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर पुढील कारवाई केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये पुन्हा हाहाकार! गंडकी नदीला अचानक पूर, घरं-पूल गेले वाहून; पहाटे नागरिकांचे स्थलांतर, बचावकार्य सुरू

IND vs NZ ODI Series: भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ जाहीर! ‘या’ खेळाडूंचं पुनरागमन, पाहा संपूर्ण स्क्वॉड

IND W vs ZIM W: भारत-झिम्बाब्वे महिला क्रिकेट मालिकेचं वेळापत्रक जाहीर! कधी, कुठे रंगणार टी-२० आणि वनडे सामने? पाहा संपूर्ण वेळापत्रक

BEST Bus Stop: प्रवाशी वाऱ्यावर, बेस्टच्या बस थांब्यात फ्लिपकार्टचं दुकान;वांद्र्यातला धक्कादायक प्रकार

VIRAL VIDEO: ‘रीटेक्सपासून रासपर्यंत’; ऐश्वर्या नारकर यांचा गरबा पाहिलात का? नेटकरी म्हणाले…

SCROLL FOR NEXT