Gym In UP 
देश

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

Man Dies Of Heart Attack: जिममध्ये व्यायाम करणाऱ्या एका व्यक्तीचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय.

कार्तिक पुजारी

वाराणसी- उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. जिममध्ये व्यायाम करणाऱ्या एका व्यक्तीचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू झालाय. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांनी चिंता व्यक्त केली असून कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीचा हा दुष्णरिणाम असल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु झाली आहे.

जिममध्ये व्यायाम करत असताना व्यक्ती अचानक कोसळला आहे. व्हिडिओमध्ये ही धक्कादायक घटना कैद झाली आहे. ३० एप्रिलची ही घटना असून व्यक्ती डोक्याला हात लावून काही वेळ बसलेला असतो आणि अचानक तो जमिनीवर कोसळतो. सदर घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल केला जात आहे. असा दावा करण्यात येतोय की, व्यक्ती एकदम तंदुरुस्त होता. गेल्या १० वर्षांपासून तो जिम करत होता.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, व्यक्ती एका बँचवर बसला आहे. डोकं दुखत असल्याचं तो सहकार्यांना सांगतो. डोक्याला हात लावून तो बसलेला असतो. अचानक तो जमिनीवर कोसळतो. जिममध्ये असलेले लोक जमिनीवर पडलेल्या व्यक्तीकडे धाव घेतात. व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येते. पण, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सदर घटनेमुळे अनेकांना धक्का बसला आहे.

लोकांनी कोविशिल्डवर व्यक्त केली शंका

देशात तरुणामध्ये हर्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाच्या महामारीनंतर देशात यात वाढ झाल्याचा लोकांचा दावा आहे. लोक या घटनेला कोरोना काळात घेतलेल्या प्रतिबंधात्मक लशीची जोडून पाहात आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये लहान मुलांमध्ये देखील हर्ट अटॅकचे प्रमाण वाढल्याचं दिसून आलं आहे. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये चिंतेची भावना आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT