Madurai-Delhi Indigo Flight esakal
देश

Indigo Airlines : आकाशात उडणाऱ्या विमानात प्रवाशाला रक्ताच्या उलट्या; इमर्जन्सी लँडिंगनंतर 'त्याचा' मृत्यू

मदुराईहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये (Indigo Airlines) एका प्रवाशाची प्रकृती खालावली.

सकाळ डिजिटल टीम

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळं मदुराई-दिल्ली फ्लाइट इंदूरला वळवण्यात आली आणि संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तिथं उतरवण्यात आली.

Madurai-Delhi Indigo Flight : मदुराईहून दिल्लीला येणाऱ्या विमानामध्ये (Indigo Airlines) एका प्रवाशाची प्रकृती खालावली. आकाशात उडणाऱ्या विमानात प्रवाशाला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. त्याची अवस्था पाहून विमान मध्यभागी थांबवावं लागलं.

तेथून प्रवाशाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी रुग्णाला पाहताच मृत घोषित केलं. हे प्रकरण मदुराईहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो विमानातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी मदुराईहून दिल्लीला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6A-2088 मधील एका व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर विमानाला इंदूर विमानतळावर उतरवण्यात आलं. तेथून प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अतुल गुप्ता असं मृत प्रवाशाचं नाव आहे. तो नोएडामधील रहिवासी आहे.

इंदूरमध्ये केलं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग

वैद्यकीय आणीबाणीनंतर, शनिवारी संध्याकाळी विमान इंदूर विमानतळाकडं (Indore Airport) वळवण्यात आलं. विमान इंदूर विमानतळावर उतरल्यानंतर प्रवाशाला रुग्णालयात नेण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. प्रवासी अतुल गुप्ता हे सुमारे 60 वर्षांचे होते. ते इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाइट 6A-2088 मध्ये चढले आणि प्रवासात त्यांची प्रकृती खालावल्यामुळं त्यांच्या तोंडातून रक्त येऊ लागलं.

प्रवाशाला रक्तदाब-मधुमेह आजारांनी ग्रासलं होतं

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीमुळं मदुराई-दिल्ली फ्लाइट इंदूरला वळवण्यात आली आणि संध्याकाळी 5.30 च्या सुमारास तिथं उतरवण्यात आली. गुप्ता यांना विमानतळावरून रुग्णालयात नेण्यात आलं, तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. प्राथमिक माहितीनुसार, गुप्ता यांना रक्तदाब आणि मधुमेहासह काही आजारांनी ग्रासलं होतं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विमानानं शेवटी 6.40 च्या सुमारास दिल्लीसाठी उड्डाण केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT