crime_woman Sakal
देश

हुंडा न दिल्याने सासरच्यांकडूनच सामूहिक बलात्कार, नवऱ्यानेच शूट केला व्हिडीओ

महिलेच्या घरच्यांना दीड लाख रुपये हुंडा देता आला नाही, म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

हुंडा दिला नाही म्हणून राजस्थानमधल्या एका व्यक्तीने आपल्याच नातेवाईकांकरवी आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकाराचा व्हिडीओही त्याने शूट केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावरही अपलोड केला आहे. महिलेच्या घरच्यांना दीड लाख रुपये हुंडा देता आला नाही, म्हणून हा धक्कादायक प्रकार करण्यात आला आहे.

आता आपण हा व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करून त्यातून पैसे मिळवणार असल्याचं या व्यक्तीने आपल्या पत्नीला सांगितलं. या प्रकरणी पत्नीने लैंगिक अत्याचाराप्रकरणी आपला पती आणि त्याचे दोन नातेवाईक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी महिलेने सांगितलं की, माझ्या सासरचे लोक हुंड्यासाठी माझा छळ करत होते. जेव्हा त्यांना हुंडा दिला नाही, तेव्हा त्यांच्या नातेवाईकांना माझ्यावर सामुहिक बलात्कार करण्यास भाग पाडलं, ही घटना शूट केली आणि हे व्हिडीओ युट्यूबवर टाकले. त्यानंतर एका आरोपीने मला पाच दिवसांपूर्वी कमान इथं आणलं आणि पुन्हा बलात्कार केला, पण मी तिथून पळून माझ्या घरी आले. या दोघांचंही लग्न २०१९ साली झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सुवेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

पश्चिम बंगालचे नवे 'अधिकारी'! ५५ वर्षीय सुवेंदू अविवाहित का? आदर्श मानलेल्या तिघांच्या पावलावर पाऊल

Marathi Writing Tool: व्याकरण तपासक तुम्हाला नेमकं जे म्हणायचं आहे ते कसं सांगायला मदत करतो

पहिलाच सिनेमा ब्लॉकबस्टर पण एका चुकीच्या निर्णयामुळे उध्वस्त झालं बॉलिवूड अभिनेत्रीचं करिअर ! कोण आहे ती ?

Parbhani News: गोदापात्रातून जेसीबीने वाळूचा अवैध उपसा; वाळूमाफियांकडून ओरबडणे सुरूच; महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT