Man gets friend to rape minor wife, then divorces her at Chhattisgarh 
देश

एकाची पत्नी, दुसऱयाचा बलात्कार अन् तिसरीवर प्रेम

वृत्तसंस्था

रायपूरः प्रेयसीसोबत विवाह करण्यासाठी एकाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार करायला लावल्याची घटना छत्तीसगडमध्ये घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकोणीस वर्षाच्या युवकाचे 40 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. परंतु, त्याला पत्नीसोबत घटस्फोट घेऊन प्रेयसीसोबत विवाह करायचा असल्यामुळे त्याने त्याच्या मित्राला पत्नीवर बलात्कार करायला लावला. याप्रकरणी पीडित पत्नीने गुन्हा दाखल केला असून, पती व त्याच्या मित्राला अटक करण्यात आली आहे.

पीडित पत्नीने तक्रारीमध्ये म्हटले आहे की, कावर्धा जिल्ह्यातील पिपर तोला या गावातील खिलेंद्र साहू याचे 40 दिवसांपूर्वी विवाह झाला होता. खिलेंद्र याने पत्नीला आधार कार्ड काढायचे आहे, असे सांगून शेजारच्या शहरात घेऊन गेला. शहरात गेल्यानंतर त्याने दोन स्टॅम्प पेपरवर पत्नीला स्वाक्षरी करायला लावली. यानंतर पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये खिलेंद्रचा मित्र कमलेश होता. खिलेंद्र याने पत्नीला हॉटेलमध्येच थांबवून काही वेळात येतो म्हणून बाहेर गेला. बराच वेळ तो आलाच नाही. दरम्यान, कमलेश याने बलात्कार केला. बलात्कारनंतर खिलेंद्र याने पत्नीला तिच्या माहेरी सोडले. काही दिवसांनी कमलेश पीडित महिलेच्या घरी गेला. स्टॅम्प पेपर दाखवत ही आपली पत्नी असल्याचा सांगू लागला. यामुळे ही घटना उघडकीस आली. खिलेंद्र याने गावातील ज्येष्ठ नागरिकांसमोर पत्नीच्या चारित्र्यावर संशय उपस्थित करत घरी घेऊन जाण्यास नकार दिला. आपण कमलेश आणि पत्नीला हॉटेलमध्ये एकत्र पाहिले आहे, असा दावा त्याने केला. कलमेश याने मात्र आपल्याला खिलेंद्र याने असे करायला सांगितले. खिलेंद्रला पत्नीपासून घटस्फोट घेऊन प्रेयसीकडे जायचे आहे, त्यामुळे त्याने असे करायला लावले, असे कमलेशने सांगितले.

दरम्यान, पीडित महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर खिलेंद्र आणि कमलेश दोघांनाही अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health Update : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज ! चार दिवसाच्या विश्रांतीनंतर घरी परतणार

Latest Marathi News Live Update : नळदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी १४ कोटींचा विकास आराखडा

आई झाल्यावर पहिल्यांदाच दिसली कतरिना, चाहत्यांना बघत क्यूट स्माइल देत केलं असं काही की... VIRAL VIDEO

Stock Market Today : शेअर बाजाराची हिरव्या रंगात सुरुवात! सेन्सेक्स 500 अंकांनी वाढला; IT शेअर्समध्ये वाढ; कोणते शेअर्स तेजीत?

Donald Trump : कोट्यवधी लोकांचा बळी गेला असता, भारत-पाक अणुयुद्ध मी थांबवले; ट्रम्प यांचा पुनरूच्चार

SCROLL FOR NEXT