देश

धक्कादायक! मुलीच्या रडण्याच्या आवाजामुळे पत्नीला तोंडी तलाक

वृत्तसंस्था

इंदूर : लहान मुलीच्या रडण्याच्या आवाजाने झोपमोड झाल्याने एका पतीने आपल्या पत्नीला तलाक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही घटना मध्य प्रदेशातील इंदूर येथे घडली. या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर ही घटना समोर आली. 

उज्मा अन्सारी असे 21 वर्षीय पीडित महिलेचे नाव आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले, की माझी मुलगी आजारी होती. त्यामुळे ती रात्री सातत्याने रडत होती. या रडण्याच्या आवाजामुळे पतीची झोपमोड झाली. त्यामुळे त्याने मुलीला मारुन टाकण्याची धमकी देत माझ्याशी भांडण सुरु केले. आमचे भांडण झाल्याचे समजल्यानंतर माझे सासरे व पतीचा भाऊही खोलीत आले. त्यांनीही मला मारहाण करण्यास सुरवात केली.

तसेच त्यानंतर माझ्या लहान मुलीला पलंगावरुन खाली ढकलून दिले. त्याचदरम्यान पतीने तीन वेळा तलाक बोलून माझ्या आईला फोन केला आणि मला या घरातून घेऊन जाण्यास सांगितले. माझ्यासह मुलीलाही घराबाहेर काढण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cough-Based TB Detection Using AI: खोकल्याच्या आवाजावरूनच कळणार क्षयरोग! ‘AI’मुळे आरोग्य सेवेत मोठी क्रांती

Ashok kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातचा तुरुंगातील मुक्काम वाढला ! न्यायालयाने सुनावली १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Kolhapur Tunnel Project : कोल्हापुरात भुयारी मार्ग होणार, शिवाजी स्टेडियम ते अंबाबाई मंदिरापर्यंत असणार भुयारी मार्ग

Call Scams : जर तुमच्या मोबाईलवर येत आहे सायलेंट फोन; तर सावध व्हा, नवा AI फ्रॉड करेल बँक खाते रिकामे, पाहा सुरक्षित कसे राहाल

"तो दारुडा, तुला सोडून देईल" प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईनेच केलेला लग्नाला विरोध; कोण आहे ही कलाकार ?

SCROLL FOR NEXT