देश

प्रचाराला आलेल्या भाजप आमदाराच्या गळ्यात चपलांचा हार

वृत्तसंस्था

भोपाळ - मध्य प्रदेशमधील खाचरोद मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवत आहेत. सोमवारी संध्याकाळी ते आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी गेले असता अचानक एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. सुरुवातीला आमदार महोदयांना काहीच कळले नाही. मात्र गळ्यात चपलांचा हार पाहिल्यावर संतप्त झालेल्या आमदारांनी या व्यक्तीला मारहाण केली.

दरम्यान, सलग तीन वेळा मध्य प्रदेशची सत्ता मिळवणाऱ्या भाजपला यावेळच्या निवडणुकीत मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी प्रचाराला येणाऱ्या भाजप उमेदवारांना मतदारांकडून प्रश्न विचारले जात आहेत.

विषेश म्हणजे, आमदारांना चपलांचा हार घालणाऱ्या व्यक्तीने भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ असलेली टोपी घातली होती. या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नसून या प्रसंगातून मध्यप्रदेशात भाजपविषयी असलेली नाराजी स्पष्ट दिसत असल्याचे बोलले जात आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

'चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवणार…?' दहशतवादी हल्ल्याच्या धमकीनंतर नेटकऱ्यांनी घेतली मजा

The Patna-Kota Express Train: स्टेशन मास्तरला झोप लागली अन्.. अर्धा तास हॉर्न वाजवत राहिला ट्रेनचालक

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Kangana Ranaut : ''निवडणूक जिंकले तर बॉलीवूड सोडणार'', कंगना रणौतने जाहीर केली भूमिका

SCROLL FOR NEXT