man killed 5 family members including newly wed couple shot himself in up crime news  esakal
देश

Crime News : लग्नघरी मृत्यूचं तांडव! सख्ख्या भावानेच केली नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील ५ जणांची हत्या

रोहित कणसे

एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील 5 सदस्यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, ही भयानक घटना घडल्यानंतर आरोपीने स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. कौटुंबिक भांडणातून हे भीषण हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान अशा अनेक शक्यता असताना यूपीतील मैनपुरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली.

7 जणांचे धारदार शस्त्राने वार करण्यात आले

आपल्याच कुटुंबीयांचा काळ बनलेल्या या आरोपीने धारदार शस्त्राने 7 जणांवर वार केले. यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडली, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या वेदनादायक हत्याकांडात हत्येचा आरोप असलेल्या तरुणासह 6 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात दोन जण जखमी झाले. आरोपी तरुणाच्या भावाचे एक दिवसापूर्वीच लग्न झाले होते. ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब सहभागी होण्यासाठी एकत्र आले होते.

रात्री तीन वाजताची घटना

मिळालेल्या माहितीनुसार गोकुलपूर येथील रहिवासी सुभाष यांचा मुलगा शिववीर नोएडामध्ये कॉम्प्युटर सेंटर चालवायचा. काही दिवसांपूर्वीच तो गावी परतला होता. त्याचा धाकटा भाऊ सोनूच्या लग्नाची मिरवणूक शुक्रवारी परतली होती. रात्री अकरा वाजेपर्यंत घरात गाण्याचा आणि नाचण्याचा कार्यक्रम सुरू होता. यानंतर सर्वजण झोपी गेले. त्याचा भाऊ सोनू आणि त्याची नवविवाहित पत्नी सोनी सर्वात दूर झोपलेले होते. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास शिववीरने त्याचा भाऊ सोनू आणि नवरी सोनी यांची कोयत्याने वार करून हत्या केली. यानंतर त्याने त्याचा दुसरा भाऊ भुल्लन, भावाचा मित्र आणि मेव्हण्याचीही हत्या केली.

वडील आणि पत्नीवर देखील केला हल्ला

आरोपीने पत्नी व वडील सुभाष यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. आरडाओरडा ऐकून कुटुंबीय त्याला पकडण्यासाठी धावले असता त्याने पळ काढला आणि लपून गोळी झाडून आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT