Crime News 
देश

Crime News : इंस्टाग्राम फॉलोअर्समुळे गेला महिलेचा जीव! पोटच्या मुलांसमोर पतीने केली निर्घुण हत्या

रोहित कणसे

एका ३७ वर्षीय व्यावसायिकाने पत्नीची दोन मुलांसमोर गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर कारमध्ये हा सगळा प्रकार घडला. दरम्यान या निर्घुण हत्येचं कारण हे पत्नीचे इंस्टाग्रामवरील फॉलेअर्स असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान पीडितेचे इन्स्टाग्राम अकाऊंट सध्या लॉक आणि खाजगी असून त्याची तपासणी अधिकाऱ्यांकडून होणे बाकी आहे. पीडितेने आपल्या पतीचे अकाऊंट ब्लॉक केले होते, त्यामुळे आरोपीच्या मनात असुरक्षिततेची भावना तीव्र झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या पाठीमागे पीडितेला काही सोशल मीडिया चाहते भेटतील, असा संशय आरोपीला होता, ज्यामुळे त्यांच्या नात्यात तणाव वाढला होता, असे देखील पोलिसांनी सांगितले. पत्नीच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सचा हेवा वाटल्यानेच पतीने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कुरेभारचे एसएचओ प्रवीण कुमार यादव यांनी सांगितले की, आरोपी टूर अँड ट्रॅव्हल एजन्सीचा मालक आहे, तर त्याची पत्नी गृहिणी आहे. लखनऊच्या पारा भागात हे दाम्पत्य १२ वर्षांची मुलगी आणि पाच वर्षांच्या मुलासह राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी हे दाम्पत्य रायबरेलीच्या प्रवासाला निघाले होते, पण त्याऐवजी ते पूर्वांचल एक्स्प्रेस वेकडे वळले. पहाटे पाचच्या सुमारास आरोपी सुलतानपूर येथील मुजेश चौकात थांबला असता त्याचा पत्नीशी वाद झाला. रागाच्या भरात त्याने तिचा गळा दाबून खून केला. हे भयानक दृश्य पाहून मुले रडायला लागली मात्र आरोपीने स्वत:ला एसयूव्हीमध्ये बंद करून घेतलं.

दरम्यान UPEIDA च्या गस्ती पथकाला संशयास्पदरित्या गाडी उभी असल्याचे लक्षात येताच संशय निर्माण झाला. त्यांनी तत्काळ आपल्याला आणि जवळच्या पोलिस स्टेशनला माहिती दिली. त्यानंतर पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गाडीतील या दाम्पत्याच्या मुलीने तेथे नेमकं काय घडलं याबद्दल माहिती दिली. तिने तिच्या वडिलांनी तिच्या आईची हत्या केल्याची माहिती पोलिसांना चिली. त्यानंतर तिच्या जबाबाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dairy Chairman Election High Court Ruling : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत सर्वात मोठा ट्विस्ट; मतदानापूर्वी कोर्टाचा निकाल, बदलले सत्तेचे गणित!

Gokul Politics : "गोकुळचं दार मी उघडलं म्हणून..."; महायुतीच्या दोन बड्या मंत्र्यांवर सतेज पाटलांचा थेट प्रहार!

AI Hallucination: धक्कादायक! सरकारी आदेशातच चक्क सुप्रीम कोर्टाचे बनावट निकाल? मुंबई उच्च न्यायालयाने काय केले पाहा...

Maharashtra Live News: मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध; मेढ्यात भाजप कार्यकर्ते व नागरिकांचा भव्य मोर्चा, कठोर कारवाईचा इशारा

Diwali Bank Holiday: नोव्हेंबरमध्ये बँकांना सुट्ट्यांची मेजवानी! महाराष्ट्रासह 'या' ३ राज्यांत राहणार बंद; पाहा संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT