Man kills wife for not cooking rice with curry arrested Odisha Marathi Crime News  
देश

Crime News : बापरे! भात न शिजवल्याचा राग अनावर; संतापलेल्या पतीने केली पत्नीची हत्या

सकाळ डिजिटल टीम

पत्नीने रात्रीच्या जेवणासाठी भात केला नाही म्हणून पतीने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली. या व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या केल्याचा आरोप आहे.

पोलिसांचे म्हणणे आहे की, महिलेने जेवणासाठी भात शिजवला नाही म्हणून आरोपी इतका संतापला की त्याने पत्नीची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे.

काय प्रकरण आहे

घटना संबलपूर येथील जामनकिरा पोलीस स्टेशन हद्दीतील नुआधी गावातील आहे. दरम्यान घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय सनातन धारुआ रविवारी रात्री घरी पोहोचला आणि त्याने पाहिले की त्याची पत्नी पुष्पा धारुआ (35 वर्षीय) हिने जेवणासाठी भाजी तयार केली होती, परंतु भात शिजवला नव्हता. यावरून पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला आणि वाद इतका वाढला की संतापलेल्या सनातनने पत्नी पुष्पाची हत्या केली.

या जोडप्याला दोन अपत्य आहेत ज्यामध्ये एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी हाऊस क्लिनरचे काम करते, त्यामुळे घटनेच्या वेळी ती कामावर गेली होती. तर मुलागा त्याच्या मित्राकडे गेला होता. घरी परतल्यावर आईला जमिनीवर मृतावस्थेत पडलेले पाहून त्याने याबद्दल पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि आरोपी पतीला अटक करून कारागृहात पाठवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT