man marries 2 women in 5 days, crime, MP 
देश

इंजिनियरचा लंपटपणा, 5 दिवसांत केली 2 लग्न अन् ओढून घेतलं विघ्न

सकाळ ऑनलाईन टीम

भोपाळ : मध्य प्रदेशात एका 26 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्याने 5 दिवसांत दोन तरुणींशी विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुसऱ्या लग्नावेळी पहिल्या तरुणीच्या नातेवाईकांनी हजेरी लावल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. संबंधित तरुण आता पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. खंडवा येथील  तरुणीच्या कुटुंबियांनी यासंदर्भात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत  आहेत, अशी माहिती खंडवाचे कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक बी.एल. मंडलोई यांनी दिली.  

इंदूरच्या मुसाखेडी भागात राहणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्याने 2 डिसेंबर रोजी खंडवा येथील एका तरुणीशी लग्न केले. त्यानंतर त्याने  7 डिसेंबरला इंदूरच्या महू येथे दुसर्‍या तरुणीशीही विवाह थाटला. खंडवातील तरुणीशी विवाह झाल्यानंतर संबंधित तरुणाने नवविवाहितेला आपल्या इंदुरच्या घरी नेले.  त्यानंतर त्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न केले.  अत्यावश्यक कामासाठी भोपाळला जातोय असे सांगून तो दुसऱ्या तरुणीशी लग्न करण्यासाठी घरातून बाहेर पडला होता.  

पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, इंदुरमधील महू तालुक्यात पार पडलेल्या दुसऱ्या विवाहात खंडवातील तरुणीचे नातेवाईकही सहभागी झाले होते. त्यांनी लग्नाचे फोटो खंडवातील मुलीच्या कुटुंबियांना पाठवले. त्यानंतर संबंधित कटुंबियांनी तरुणाच्या विरोधात तक्रार दाखल केली. तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  खंडवातील मुलीशी लग्न केले त्यावेळी त्याला 10 लाख रुपये आणि  घरगुती वस्तुवंर मोठा खर्च करण्यात आला होता, अशी माहितीही तरुणाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करणाऱ्या कुटुंबियांनी दिली आहे. संबंधित तरुण फरार असून त्याचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT