love affair  File photo
देश

प्रियकराने गर्लफ्रेंडच्या घरात उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

दोघेही रुममध्ये असताना, त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज ऐकू आला

दीनानाथ परब

मुंबई: मुलीच्या आई-वडिलांचा प्रेमसंबंधाला (Love affair) विरोध असल्याने प्रियकराने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रेयसीचा (Girlfriend) गळा चिरला. अजित असे आरोपीचे नाव आहे. तामिळनाडू तारामनी येथे मुलगी राहते. अजितने तिच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

मुलगा अजित तामिळनाडू मीनजूरचा रहिवाशी आहे. रविवारी ही दुर्देवी घटना घडली. मोबाइल रिटेल शोरुममध्ये नोकरी करताना अजितची मुली बरोबर ओळख झाली. तो तिच्या प्रेमात पडला. मुलीच्या आई-वडिलांनी त्यांच्या नात्याला मान्यात दिली नाही. तिचं दुसरीकडे लग्न ठरवलं. हे समजल्यानंतर संतप्त झालेला अजित तारामनीमधील मुलीच्या घरी जाऊन धडकला.

यावर काहीतरी तोडगा काढण्याच्या उद्देशाने तो मुलीच्या घरी गेला होता. दोघेही रुममध्ये असताना, त्यांच्या खोलीतून भांडणाचा आवाज ऐकू आला. कुटुंबीयांनी दरवाजा उघडला, त्यावेळी मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. अजितच्या हातात चाकू होता. अजित लगेच दुसऱ्या खोलीत पळाला त्याने स्वत:ला लॉक करुन घेतले. मुलीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले व पोलिसांना माहिती दिली. तारामणी पोलीस मुलीच्या घरी पोहोचले. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी अजित गळफास घेतलेल्या स्थितीमध्ये होता.

त्याला लागलीच रुग्णालयात हलवण्यात आले. डॉक्टरांना दोघांचे प्राण वाचवण्यात यश आले. अजित येताना सोबत चाकू घेऊन आला होता. मुलीने लग्नाचा प्रस्ताव नाकारला, तर तिला जीवे मारण्याची त्याने तयारी केली होती, असे पोलिसांनी सांगतिले. हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात नोंदवण्यात आल आहे. अजितला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

सुवर्णपदकासोबत भारतीय खेळाडूंना मिळाल्या ‘त्या’ बाहुल्यां नेमक्या कशासाठी दिली जाते ही खास भेट? जपानच्या रंजक परंपरेमागचं कारण काय?

टँकरला धडकून कारचा चुराडा, डॉक्टर दाम्पत्यासह २ चिमुकल्यांचा मृत्यू; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Marathi News Live Updates: गरोदर पत्नी व मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

SCROLL FOR NEXT