देश

ममतांच्या भाच्यावर हात उचलणाऱ्याचा रहस्यमयी मृत्यू

कुटुंबाकडून हत्येचा आरोप

दीनानाथ परब

कोलकाता: ममता बॅनर्जींचा (mamta Banerjee) भाचा आणि तृणमुल खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या कानाखाली मारणाऱ्या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. देवाशिष आचार्य (Devasish Acharya) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गुरुवारी एका अज्ज्ञात व्यक्तीने देवाशिष यांना पश्चिम बंगालमधील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळाने देवाशिष यांना मृत घोषित केल. २०१५ साली देवाशिषने अभिषेक बॅनर्जी यांच्या कानशिलात लगावली होती. (Man who slapped mamtas nephew Abhishek Banerjee dies mysteriously family claims murder)

गंभीर अवस्थेत असलेल्या देवाशिष यांना मिदनापोरमधील तामलुक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. हॉस्पिटल रेकॉर्डनुसार, गुरुवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास देवाशिषला रुग्णालयात आणले. रुग्णालयात आणून सोडल्यानंतर ती अज्ज्ञात व्यक्ती निघून गेली. दुपारी त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांना देवाशिष यांच्या रहस्यमयी मृत्यूबद्दल समजल्यानंतर त्यांनी हत्या झाल्याचा आरोप केला आहे.

देवाशिष आचार्य यांचा रहस्यमयी पद्धतीने मृत्यू झाल्याने भाजपाने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. देवाशिष २०२०मध्ये भाजपात दाखल झाले होते. १६ जूनच्या संध्याकाळी देवाशिष त्यांच्या दोन मित्रांसह बाहेर गेले होते, अशी माहिती प्राथमिक चौकशीतून समोर आलीय. या दरम्यान देवाशिष यांना एक फोन कॉल आला आणि ते मित्रांना चहाच्या टपरीवर सोडून निघून गेले. त्यानंतर काय घडलं, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT