Rain Video
Rain Video सकाळ
देश

Manali Rain Video : भिंत खचली, चूल विझली! पाहता पाहता स्टेट बँक गेली वाहून; पुराचे थरकाप उडवणारे व्हिडिओ

दत्ता लवांडे

हिमाचल प्रदेश : उत्तर भारतातील अनेक भागांत पावसाने कहर केला असून मोठमोठे रस्ते, वाहने, इमारती, पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेशमधील व्यास नदीला मोठा पूर आला असून येथील ५० वर्षे जुना असलेला पूल वाहून गेला आहे. त्याचबरोबर दिल्लीतील गुरूग्राम येथील इमारतीखाली पाणी साचलं आहे.

पावसामुळे पाण्यात वाहून गेलेल्या इमारतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये नदीच्या काठावर बांधलेली व्यावसायिक इमारत पाण्यात वाहून गेली. यावेळी इथे असेलेले SBI चे ATM सुद्धा लोकांच्या डोळ्यांसमोर वाहून गेले. हा प्रकार सुरू असताना लोक फक्त पाहातच राहिले आहेत. हे थरारक दृश्ये पाहून आपल्यालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये मनाली येथील मणिकरण साहिब गुरूद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याचं दिसत आहे. नदीच्या शेजारी असलेला गुरूद्वारा अर्धा पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे. तर मनाली येथे पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या गाड्या पाण्यात वाहून गेल्या असून व्यास नदीवरील पूलही वाहून गेला आहे.

दरम्यान, काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे उत्तर भारतात पर्यटनासाठी जात असलेल्या पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे. तर अशा वेळी पर्यटनाला जाणे टाळले पाहिजे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

IPL 2024 RR vs KKR Live Score: तब्बल तीन तासांच्या विलंबानंतर राजस्थान-कोलकाता संघात 7-7 ओव्हरचा सामना; श्रेयस अय्यरने जिंकला टॉस

SCROLL FOR NEXT