देश

Mandi Constituency Lok Sabha Election Result: राजकुमारावर क्विननं मारली बाजी; मंडीमधून कंगना रनौत विजयी, चित्रपटातून घेणार संन्यास ?

Mandi Constituency Lok Sabha Election Result: भारतीय जनता पक्षाची उमेदवार कंगना रनौत (Kangana Ranaut) ही विजयी झाली आहे.

priyanka kulkarni

Mandi Constituency Lok Sabha Election Result: लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचं म्हणजेच सातव्या टप्प्याचं मतदान काल (1 जून) पार पडलं. यंदाच्या निवडणुकीत कोण विजयाचा गुलाल उधळणार? आणि कोणाचा पराभव होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता हिमाचल प्रदेशमधील (Himachal Pradesh) मंडी (Mandi) येथील लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. भारतीय जनता पक्षाची उमेदवार कंगना रनौत (Kangana Ranaut) ही विजयी झाली आहे. कंगनानं काँग्रेसच्या विक्रमादित्य सिंह (Vikramaditya Singh) यांचा पराभव केला आहे.

मंडीमध्ये कुणाचा दबदबा?

मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये गेली 71 वर्ष काँग्रेसचा दबदबा पहायला मिळाला. 1952 पासून काँग्रेसने 12 वेळा ही जागा जिंकली आहे. पण आता मंडी लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कंगनानं बाजी मारली आहे.

विक्रमादित्य सिंह हे ‘टिक्का साहेब’ या नावां देखील ओळखले जातात. विक्रमादित्य सिंह यांच्या काही निवडणूक रॅलींमध्येही लोकांची गर्दी दिसून आली आहे. त्यांच्या रॅलीदरम्यान, “राजा का बेटा जीतेगा” अशा घोषणा रस्त्यावर ऐकू आल्या. तर दुसरीकडे कंगनानं देखील तिच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. "जर निवडणुक जिंकले तर अभिनयक्षेत्र सोडणार", असंही कंगनानं सांगितलं होतं. त्यामुळे आता कंगना ही सिनेसृष्टीतून संन्यास घेणार का? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

विक्रमादित्य सिंह यांची राजकीय पार्श्वभूमी

विक्रमादित्य सिंह यांचे वडील वीरभद्र सिंह हे हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. 2021 मध्ये वीरभद्र सिंह यांचे निधन झाले. विक्रमादित्य यांच्या आई प्रतिभा सिंह या विद्यमान खासदार आहेत. या जागेवर विक्रमादित्य सिंह यांच्या कुटुंबाचे वर्चस्व गेली काही वर्ष पहायला मिळत आहे. पण 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या राम स्वरूप शर्मा यांनी विजयाचा गुलाल उधळला होता.

2019 च्या निवडणुकीचा निकाल

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राम स्वरूप शर्मा यांनी मंडी मतदारसंघातून 638,441 मते मिळवून विजय मिळवला. तर काँग्रेसचे आश्रय शर्मा दुसऱ्या क्रमांकावर होते. पण राम स्वरूप शर्मा यांच्या निधनानंतर 2021मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत तिने काँग्रेससाठी बाजी मारली.

जोरदार प्रचार

कंगना आणि विक्रमादित्य सिंह यांनी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कंगनासाठी प्रचार केला.तर काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनीही विक्रमादित्यच्या समर्थनार्थ रॅली काढली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT