Police Action Video  
देश

Video: मंगळुरू पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आवळल्या चोराचा मुसक्या

पोलिसांनी तीन गुन्हेगारांपैकी दोघांना ताब्यात घेतले आहे.

निनाद कुलकर्णी

मंगळुरू : तुम्ही जर बॉलिवूड आणि टॉलिवूड चित्रपटांचे चाहते असाल तर तुम्ही असे अनेक सीक्वेन्स पाहिले असतील ज्यात पोलीस चोराला पकडण्यासाठी पाठलाग करत आहेत. मात्र, खऱ्या आयुष्यात एखादा पोलीस तुमच्यासमोर गुन्हेगाराचा पाठलाग करताना दिसला तर? मंगळुरूच्या नेहरू मैदानाच्या रस्त्यावर गुरुवारी दुपारी लोक आश्चर्यचकित झाले, जेव्हा एक पोलीस मोबाइल फोन चोरल्याचा आरोप असलेल्या चोराचा पाठलाग करत होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला असून या घटनेत तीन गुन्हेगारांपैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ()

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळच्या राजस्थानच्या असलेल्या एका व्यक्तीचा मोबाईल तिघा जणांनी हिसाकावून घेतला. त्यानंतर नेहरू मैदानाजवळ एक व्यक्ती कोणाचा तरी पाठलाग करताना पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर पळून जाणाऱ्या व्यक्तीनी संबंधित व्यक्तीचा मोबाईल चोरून नेल्याचे पोलिसांना कळाले.

दरम्यान, सहाय्यक राखीव उपनिरीक्षक (ARSI) वरुण अल्वा यांनी चोराचा सिनेस्टाईलने पाठलाग करून त्याला पकडले. या व्हिडिओमध्ये अल्वा हे चोराला पकडण्यासाठी अरुंद गल्ल्यांमधून धावताना दिसून येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीरमार्ग येथील 32 वर्षीय रहिवासी असलेल्या हरीश पुजारी याला पकडण्यात यश मिळविले. या सर्वघटनेनंतर वरुण अल्वा यांनी आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याबद्दल 10,000 रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त एन शशी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT