Ram Mandir 
देश

थेट अयोध्येतून : राममंदिरासाठी 65 टक्के कोरीव काम पूर्ण! (Video) 

मंगेश कोळपकर

अयोध्या : रामजन्मभूमीमध्ये नियोजित राम मंदिर उभारण्यासाठी दगडांवर 65 टक्के कोरीव काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अयोध्येतील प्रवक्ते प्रवक्ते शरद शर्मा यांनी 'सकाळ'शी बोलताना रविवारी सकाळी सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

कारसेवकपुरममध्ये 1989 मध्ये शीला पूजन झाल्यानंतर दगड घडविण्यास प्रारंभ झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत येथे गुजरात आणि राजस्थानमधून येणाऱ्या दगडांवर नक्षीदार कोरीव काम करून त्यातून खांब, कमानी तयार करून ते कारसेवकपुरममध्ये ठेवण्यात आले आहे. मंदिराचा नियोजित आराखडा तयार करन येथे ठेवण्यात आला आहे. न्यायालयाने आता रामजन्मभूमीच्या बाजूने निकाल दिल्यामुळे मंदिराच्या कामाला वेग येईल, असे शर्मा यांनी सांगितले. मंदिर उभारणीसाठी सुरूवातीला दान, देणगी याच्या माध्यमातून निधी संकलन होत, परंतु आता भाविक स्वेच्छेने मोठ्या प्रमाणात निधी देतात त्यामुळे मंदिरासाठी निधीचा प्रश्‍न कधीच संपलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.

कारसेवकपुरम मध्ये गेल्या दोन दिवसापासून वातावरण बदललं आहे. निकालामुळे सध्या काम थांबले आहे. आता 400 ऐवजी पाचशे-सहाशे कारागीर आणून हे काम सुरू करण्यात येणार आहे, असे या ठिकाणी सांगण्यात आले.

रामजन्मभूमी खटल्याचा निकाल लागल्यामुळे मंदिराच्या कामाला आता नक्कीच वेळ आल्याचं चित्र कारसेवकपुरमला भेट दिल्यानंतर दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT