Manipur Violence esakal
देश

Manipur violence: CBIची मणिपुरमध्ये मोठी कारवाई!दोन अल्पवयीन मुलांसह ६ जणांना अटक, प्रेमी युगुलाची केली होती हत्या

CBIची मणिपुरमध्ये मोठी कारवाई!दोन अल्पवयीन मुलांसह ६ जणांना अटक, प्रेमी युगुलाची केली होती हत्या

Manoj Bhalerao

Manipur Violence:काही महिन्यांपूर्वी मणिपुरमध्ये एका प्रेमी युगुलाची हत्या कऱण्यात आली होती. या प्रकरणात सीबीआय आणि मणिपुर पोलिसांनी रविवारी दोन अल्पवयीन मुलांसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. या हत्येमुळे मणिपुरमध्ये हिंसाचार आणखी भडकला होता. कुकी आणि मीतेई समाजाच्या संघर्षामुळे हिंसाचार उसळला होता.

जेव्हा हा हिंसाचार तीव्र झाला होता तेव्हा या प्रेमी युगुलाची हत्या कऱण्यात आली होती. मणिपुरमधील परिस्थिती दर्शवणारा हा संतापजनक फोटो नुकताच समोर आला आहे. 6 जुलै रोजी, 17 वर्षांची मुलगी 20 वर्षीय मुलासोबत पळून गेली, परंतु हे दोघे कुकी प्रभुत्व असणाऱ्या ठिकाणी अडकले. काही लोकांनी त्यांचं अपहरण केलं आणि नंतर हत्या केली. हिंदूस्तान टाईम्सने याबद्दल वृत्त प्रकाशित केले आहे.

मणिपुरमधील हिंसाचारामुळे काही महिने तेथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यानंतर ही बंदी २३ सप्टेंबर रोजी उठवण्यात आली. ही बंदी हटवल्यानंतर सोशल मीडियावर हे फोटो समोर आल्या.

या हत्येमागील जबाबदार असणाऱ्यांना अटक केल्यानंतर, मुख्यमंत्री बिरेन सिंग यांनी ट्वीट केलं की, "मला हे सांगण्यास आनंद होत आहे की फिजाम हेमनजीत आणि हिजाम लिंथोइंगम्बी यांचे अपहरण आणि हत्येसाठी जबाबदार असलेल्या काही मुख्य गुन्हेगारांना आज चुराचंदपूर येथून अटक करण्यात आली आहे." यापुढे ते म्हणाले की, "काही लोकांना वाटत की ते गुन्हा केल्यानंतर कुठेही फरार होऊ शकतात. परंतू, कायद्याचे हात लांब आहेत, त्यातून कुणीही सुटू शकत नाही."

मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, "केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सीबीआयच्या विशेष संचालकांना मणिपूरला पाठवले होते आणि आज भारतीय लष्कर, निमलष्करी दल, आसाम रायफल्स आणि राज्य पोलिसांच्या मदतीने आम्ही या प्रकरणात चार आरोपींना चुराचंदपूर येथून अटक केली आहे. ही एक मोठी उपलब्धी आहे. मी एनआयए, सीबीआय आणि सर्व केंद्रीय दलांचे आभार मानू इच्छितो..." (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT