Manipur Violence esakal
देश

Manipur Violence : मणिपूर राज्याची तीन तुकड्यांमध्ये विभागणी करण्याची मागणी; भाजप आमदार म्हणाले, तरच हिंसा थांबेल

संतोष कानडे

नवी दिल्लीः मणिपूरमध्ये मागच्या तीन महिन्यांपासून हिंसा सुरु आहे. मैतेई आणि कुकी समाजामधला हा संघर्ष थांबायचं नाव घेत नाहीये. संताप आणणारी बाब म्हणजे एका समाजाचे लोक दुसऱ्या समाजाच्या महिलांची नग्न धिंड काढतात आणि त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करतात.

मणिपूरमधील हिंसा थांबायचं नाव घेत नाहीये, त्यातच भाजपच्या एका आमदाराने हिंसा थांबवण्यासाठी एक उपाय सांगितला आहे. मणिपूर राज्याची तीन केंद्रशासित भागांमध्ये विभागणी करण्याची मागणी त्यांनी केलीय.

कुकी समाजाचे नेते आणि भाजपचे आमदार पाऊलेनलाल हाओकिप यांचं म्हणणं आहे की, मणिपूरमध्ये शांती प्रस्थापित करायची असेल तर राज्याची तीन भागांमध्ये वाटणी केल्याशिवाय पर्याय नाही. पीटीआयला त्यांनी याबाबत मुलाखत दिली आहे.

पाऊलेनलाल म्हणाले की, मणिपूरच्या वंशपरंपरागत अलिप्ततेतला राजकीय आणि प्रशासकीय मान्यता दिली पाहिजे. कुकी समाजाच्या नेत्यांनी यापूर्वीच समाजासाठी स्वतंत्र प्रशासन पाहिजे, अशी मागणी केलेली आहे. त्यांनी एक प्रकारे कुकी नेत्यांच्या वेगळ्या राज्याची मागणी लावून धरल्याचं दिसून येत आहे.

दुसरीकडे मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह आणि मैतेई संघटनांनी या मागणीला यापूर्वीच विरोध केलेला आहे. राजकीय जाणकारांनुसार, केंद्र सरकारसुद्धा अशा वाटणीच्या विरोधात आहे.

भाजप आमदार हाओकिप यांनी सांगितलेल्या उपयायांवर टीका होत आहे. काहींच्या मते कुकी, मैतेई आणि नागा समाजाची वेगवेगळी ठिकाणं वाटून दिली तर ज्या भागांमध्ये मिश्रित लोक आहेत तिथे संघर्ष निर्माण होऊ शकतो.

दरम्यान, मणिपूर हिंसाचारामध्ये आतापर्यंत १६० लोक मृत झाल्याची माहिती आहे. तर हजारो लोक विस्थापित झालेले आहेत. राज्यात मैतेई समाजाची संख्या ५३ टक्के आहे आणि हे लोक इंफाळ घाटीमध्ये राहतात. तर नागा आणि कुकी समाजाची संख्या ४० टक्के आहे. हे लोक पहाडी भागामध्ये राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT