Manipur Violence Union minister RK Ranjan Singh house set on fire in Manipur Imphal 
देश

Manipur Violence : मणिपूरच्या हिंसाचार थांबेना! केंद्रीय मंत्र्यांचं घर जाळलं

रोहित कणसे

Manipur Violence : मणिपूरच्या इंफाळ येथे गुरूवारी (१५ जून) जमावाने केंद्रीय मंत्री आरके रंजन सिंह यांच्या घराला आग लावल्याचा भीषण प्रकार समोर आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय मंत्री या वेळी घरात नव्हते.

इतकेच नाही तर या हिंसक जमावाने न्यू चेकऑनला देखील आग लावली. यानंतर सुरक्षा रक्षकांनी अश्रू धुराच्या कांड्या फोडल्या. यापूर्वी १४ जून रोजी इंफाळ येथे लोम्फेल भागात अज्ञात लोकांनी महिला मंत्री नेमचा किपजेन यांच्या सरकारी घराला देखील आग लावली होती.

मणिपूर येथे मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. एएनआये दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी (१३ जून) रोजी झालेल्या गोळीबारात ९ लोकांचा मृत्यू झाला होता आणि १० नागरिक जखमी झाले आहेत. या दरम्यान खमेनलोक गावातील अनेक घरे देखील जाळण्यात आली. तामेंगलोंग जिल्ह्यातील गोबाजंग येथे देखील अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

मणिपूर येथे सध्याच्या स्थिती अत्यंत तणावपूर्वक आहे. राज्यात १६ पैकी ११ जिल्ह्यांमध्ये खर्फ्यू लागू आहे. तसेच इंटरनेट देखील बंद आहे. अनेक नागरिकांना मुलभूत गराज पूर्ण करण्यासाठी देखील संघर्ष करावा लागत आहे.

मणिपूर येथे एक महिन्यापेक्षा जास्त काळापासून शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. पीटीआयने दिलेल्या रिपोर्टनुसार, एक महिन्याआधी मणिपुरमध्ये मेइती आणि कुकू समुदायात झालेल्या हिंसाचारात १०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले होते तर ३१० जखमी झाले होते. राज्यातील शांततेसाठी सेना अणि निमलष्करीदलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT