update on resignation of Chief Minister N Biren Singh 
देश

Manipur Violence: मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याबाबत मोठी अपडेट, मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच...

Sandip Kapde

Manipur Violence:  मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शुक्रवारी (३० जून २०२३) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचे जाहीर केले. याआधी ते मुख्यमंत्रीपद सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता त्यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान त्यांच्या समर्थकांनीही जोरदार गोंधळ घातला आणि ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले.

बिरेन सिंह २० आमदारांसोबत राज्यपालांना भेटण्यास जात होते. मात्र त्यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते. लोकांनी बिरेन सिंह यांना थांबवले. यानंतर बिरेन सिंह यांनी राजीनामा न देण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी त्यांचा राजीनामा फाडला.

मुख्यमंत्री सचिवालय आणि राजभवनपासून सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या नुपीलाल कॉम्प्लेक्समध्ये शेकडो महिला एकत्र आल्या आणि त्यांनी बिरेन सिंह यांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले. (Manipur Violence Update)

बिरेन सिंह दुपारी 3 वाजता राज्यपाल अनुसुईया उल्के यांची भेट घेणार होते, त्यामुळे ते दुपारी 2.20 वाजता त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत 20 आमदार होते. हे सर्वजण राज्यपालांना भेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडले तेव्हा जमावाने त्यांना घेरले, त्यानंतर त्यांना परतावे लागले. काही वेळाने सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सरकारमधील इतर काही लोक बाहेर आले.

update on resignation of Chief Minister N Biren Singh

मंत्र्यांपैकी सुसिड्रो मेटिटेई यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा पत्र वाचून उपस्थित महिलांना दिला, त्यांनी तो फाडून टाकला.

सरकारचे प्रवक्ते आणि मंत्री सपम रंजन सिंह म्हणाले, “मुख्यमंत्री निवासस्थानी परत आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना लोकांच्या इच्छेचा विचार करून राजीनाम्याचा पुनर्विचार करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांची समजूत काढल्यानंतर काही मंत्री लोकांना सांगण्यासाठी बाहेर पडले की त्यांनी राजीनामा न देण्याचे मान्य केले आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT