Manipur Violence sakal
देश

Manipur Violence : मणिपूर हिंसाचार : सरकार आता झोपेतून जागे झाले - वेणुगोपाल

वेणुगोपाल ः सर्वपक्षीय बैठकीच्या निर्णयाला उशीर

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये सुरू असलेला वांशिक हिंसाचार थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. याबाबत अधिकृत माहिती देण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येत्या शनिवारी (ता.२४) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. यावर ‘सरकार आता झोपेतून जागे झाले आहे,’ अशी टीका करीत बैठकीच्या निर्णयाला खूप उशीर झाला असून हे पुरेसे नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

मणिपूरमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर शहा यांनी शनिवारी दुपारी तीन वाजता नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. यावर काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, सोनिया गांधी यांनी मणिपूरच्या नागरिकांना दिलेल्या संदेशानंतर आता केंद्र सरकारला जाग आली आहे.

‘पंतप्रधानांना वेळ नाही’

अशा प्रकारच्या गंभीर बैठकीला पंतप्रधानांच्या अनुपस्थितीतून त्यांचा भ्याडपणा व अपयशाचा सामना करण्यापाळून पळून जाण्याची वृत्ती दिसते. अनेक शिष्टमंडळांनी भेटीची मागणी केली तरीही त्यांच्याकडे वेळ नव्हता, अशी टीका वेणुगोपाल यांनी मोदींना उद्देशून केली. गृहमंत्र्यांनी स्वत:ही परिस्थिती हाताळली तरी त्याला यश आलेले नाही. त्यांच्या कारभारात आपण शांततेची अपेक्षा करू शकतो का, असा सवाल त्यांनी केला.

गोळीबारात दोन जवान जखमी

मणिपूरमधील हिंसाचारात आज पहाट पाच वाजता अज्ञात बंदुकधाऱ्याने केलेल्या गोळाबारात दोन जवान जखमी झाले. इंफाळ पश्‍चिम जिल्ह्यातील उत्कर बोलगंजमध्ये ही घटना घडली. या घटनेच्या तपासात ‘इन्सास’ ही हलकी बंदूक आढळली. गोळीबारात जवानांना किरकोळ जखमा झाल्या आहेत.

मणिपूर ५० दिवसांपासून धगधगत आहे. पण पंतप्रधान मौनात आहेत. ते स्वतः देशात नसताना सर्वपक्षीय बैठक बोलाविण्यात आली आहे. याचाच अर्थ पंतप्रधानांना ही बैठक महत्त्वाची वाटत नाही.

- राहुल गांधी, नेते, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT