Manipur Violence Sakal
देश

Manipur Violence : मणिपूर व्हायरल व्हीडिओ प्रकरणाचा तपास सीबीआय करणार; गृहमंत्रालयाचा निर्णय

संतोष कानडे

नवी दिल्लीः मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर जमावाने एका महिलेवर अत्याचारही केले. या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करणार आहे.

गृह मंत्रालयाने व्हायरल व्हीडिओचं प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. सीबीआय या प्रकरणाचा कसून तपास करणार आहे.

गृह मंत्रालय मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरित करणार असून व्हायरल व्हिडिओ प्रकरणाची सुनावणी मणिपूरबाहेर करावी, अशी विनंती केंद्र सर्वोच्च न्यायालयात करण्यात येणार आहे.

मणिपूरमध्ये मागच्या तीन महिन्यांपासून हिंसाचार सुरु आहे. मैतेई आणि कुकी समाजामधील वाद इतका चिघळाय की जाळपोळ आणि महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

मागच्या आठवड्यात मणिपूरमधला एक धक्कादायक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. त्यानंतर महिलेवर जमावाने अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा एक प्रकरण समोर आलेलं होतं.

व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त झाला. मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर विरोधकांनी ताशेरे ओढेले आहेत. आता केंद्रीय गृह मंत्रालयाने व्हायरल व्हीडिओच्या तपासाचं प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, ज्या मोबाईलवरून महिलांचा व्हायरल व्हिडिओ शूट करण्यात आला होता तो जप्त करण्यात आला आहे आणि व्हिडिओ शूट करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT