Manipur Violence eSakal
देश

Manipur Violence : मणिपूरमधील 'त्या' व्हायरल व्हिडिओ प्रकरणातील एक आरोपी अटकेत, पोलिसांनी दिली माहिती

आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले आहे.

Sudesh

मणिपूरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली होती. मे महिन्याच्या सुरुवातीला काही महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढण्यात आली होती. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला होता. देशभरातून या आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केल्याची माहिती दिली आहे.

हेरादास (वय ३२) असं या आरोपीचं नाव आहे. मणिपूरमधील थौबल जिल्ह्यातून त्याला अटक करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तो हिरव्या रंगाच्या शर्टमध्ये दिसत आहे, असं पोलिसांनी सांगितलं. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. मणिपूरमध्ये गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण आहे.

पोलिसांनी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी १२ पथके तयार केली होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Manipur Viral Video)

सर्वोच्च न्यायालयाची प्रतिक्रिया

या व्हिडिओवरुन देशभरात सध्या संतापाची लाट उसळली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी याबाबत गुरुवारी केंद्र आणि राज्य सरकारला फटकारले.

पंतप्रधान मोदींचे आदेश

दरम्यान, या घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी दुःख व्यक्त केले. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी याबाबत संवाद साधला. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आपण मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना दिल्याचं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: बंडखोर खासदारांचे कोणतेही पत्र आलेले नाही; ओम बिर्लांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याचा दावा

Vilas Ghule Murder Case: विलास घुले हत्या प्रकरण! मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन स्थगित; पुरवणी जबाबात खासदारपुत्राचे नाव समाविष्ट

Asim Munir: पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्या हत्येचा इस्रायलकडून कट; शोधपत्रकाराचा दावा, दोन देशातल्या मध्यस्थीचं कारण

Latest Marathi News Update: राज्यासह देशात विदेशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Water Tanker Rate Issue : पाणीटंचाईच्या संकटात टँकरच्या दरांची लूट; नागरिकांमध्ये संताप

SCROLL FOR NEXT