Manipur Violence 
देश

Manipur Violence : मणिपूरमध्ये हजारहून अधिक महिलांच्या जमावाचा जवानांवर हल्ला; 12 कट्टरपंथियांना सोडण्यात पाडलं भाग

रोहित कणसे

मागील जवळपास ५० दिवसांपासून मणिपूर येथे जातीय हिंसाचार सुरू आहे. यादरम्यान मणिपूरमध्ये महिलांच्या एका गटाने लष्कराच्या सैनिकांवर हल्ला करत १२ कट्टरपंथियांची सुटाक केली. महिलांच्या नेतृत्वातील तब्बल १,५०० लोकांच्या जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांना घेरल्याने जवानांनाना शनिवारी १२ कांगलोई यावोल कन्ना लुप (KYKL) च्या कट्टरपंथियांना नाईलाजाने सोडून द्यावे लागले. सैन्य अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर माध्यमांना याबद्दल माहिती दिली.

लष्कराच्या प्रवक्त्यांनी देखल या घटनेला दुजोरा दिला आहे. यामध्ये लष्कराच्या जवानांना शोधमोहिम राबवत असताना १२ केवाईकेएल सदस्यांना पकडले होते, त्यामध्ये मोइरंगथेम तम्बा उर्फ उत्तम देखील होता, जो २०१५ मध्ये घात लावून केलेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड होता, या हल्ल्यात तब्बल १८ जवानांचा मृत्यू झाला होता.

लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, दुपारी जवळपास २.३० वाजता विशेष गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करताना इम्फाळ पूर्वेला इथम गावात सुरक्षा दलांनी एक ऑपरेशन सुरू केले होते. या ऑपरेशनमध्ये गावाची नाकेबंदी करण्यात आली होती.

ज्यामध्ये १२ केवाईकेएल कॅडर्सना शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यासह पकडण्यात आलं होतं. पकडलेले १२ लोकांपैकी एक हा २०१५ मध्ये झालेल्या डोगरा येथील घातपाती हल्ल्याचा मास्टरमाइंड, स्वघोषित लेफ्टनेंट कर्नल मोइरांघथेम तम्बा उर्फ उत्तम हा देखील होता.

सेना अधिकाऱ्याने सांगितले की, थोड्याच वेळात महिला आणि स्थानिक नेत्यांच्या नेतृत्वात तब्बल १,२०० ते १,५०० लोकांचा जमावाने ऑपरेशन सुरु असलेल्या ठिकाणाला वेढा दिला आणि ऑपरेशन थांबवलं. महिलांची गर्दी आक्रमक होत असताना त्यांना ऑपरेशन सुरू ठेवू देण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली, मात्र त्याचा कुठलाही फरक पडला नाही.

महिलांची आक्रमकता आणि परिस्थितीचं गांभिर्य ओळखून १२ केवायकेएल कट्टरपंथियांना सोडून देण्यात आलं. यादरम्या सुरक्षा दलाने स्फोटके आणि इतर शस्त्रात्र मात्र जप्त केली आहेत.

आतापर्यंत ३ मे पासून मेइती आणि कुकी समुदायात सुरू असलेल्या जातीय हिंसाचारात ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. मेईती समुदायाला अनुसूचित जाती (एसटी)चा दर्जा दिला जाण्याबद्दलच्या कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांद दोन्ही समुदायंमध्ये हिंसा पेटली होती. यानंतर जातीय हिंसाचार संपूर्ण राज्यात पसरला, या हिंसाचारात शेकडो घरांना आगी लावण्यात आल्या आहेत. या दरम्यान हजारो लोक विस्थापित झाले आहेत, अनेकांनी शेजारील राज्यात आसरा घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT