Arvind kejriwal manoj tiwari manish sisodia esakal
देश

Gujarat Election 2022: ''अरविंद केजरीवालांची हत्या होऊ शकते'' मनोज तिवारींच्या अटकेची मागणी

संतोष कानडे

नवी दिल्लीः आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी खळबळजनक शंका उपस्थित केली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं ते म्हणाले आहेत.

मनिष सिसोदिया म्हणाले की, आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची हत्या होऊ शकते. एमसीडी आणि गुजरात निवडणुकीत पराभवाच्या भीतीने भाजप कट रचत आहे. भाजप खासदार मनोज तिवारी यांचं नाव या कटामध्ये असल्याचं सिसोदिया म्हणाले.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

मनोज तिवारी यांना अटक करा, अशी मागणी मनिष सिसोदिया यांनी केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे याबाबत तक्रार करणार असल्याचंही सिसोदिया यांनी सांगितलं.

''भाजपने केजरीवाल यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे प्रयत्न सफल होत नाहीत म्हणून मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांना धमकी दिली आहे. त्यावरुन अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे आम्ही याची तक्रार करणार आहोत. मनोज तिवारी यांना अटक करुन त्यांची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे.'' असं सिसोदिया म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषदेतून हे आरोप केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET 2026 री-एग्झामचा सुद्धा पेपर झाला लीक? टेलिग्रामवरील दाव्यांची NTA कडून सायबर क्राइमकडे चौकशी

Nagpur News : पुन्हा ‘नीट’ परीक्षा देण्याची हिम्मत नाही; विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, सुसाइड नोटमुळे खळबळ

Monsoon Alert: मुंबईत ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा २४ वेळा धडकणार! सर्वात मोठी भरती कधी येणार? मान्सूनसोबत हाय टाइडचाही धोका

Indian Visa Regulations: परदेशी नागरिकांसाठी भारताचे व्हिसा नियम बदलले; एका चुकीमुळे होऊ शकते मोठी कारवाई!

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT