Kejriwal Government esakal
देश

Kejriwal Government : SC चा निकाल येताच केजरीवालांना मोठा धक्का; सिसोदिया, जैन यांचा मंत्रिपदाचा राजीनामा!

मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

दिल्ली दारू धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये.

दिल्लीतील केजरीवाल सरकारमधील (Kejriwal Government) दोन मंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) आणि सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांनी पदाचा राजीनामा दिलाय. वृत्तानुसार, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोघांचा राजीनामा स्वीकारला आहे.

राजीनामा दिलेले हे दोन्ही नेते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत. दिल्ली दारू धोरण प्रकरणात (Delhi Liquor Policy Case) अटक करण्यात आलेल्या मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) अटकेला आव्हान देणाऱ्या सिसोदिया यांचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिलाय. न्यायालयानं त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचा सल्लाही दिला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीजेआय जस्टिस डीवाय चंद्रचूड सिसोदिया यांच्या वकिलाला म्हणाले, तुम्ही हायकोर्टात जायला हवं होतं, तुम्ही थेट सर्वोच्च न्यायालयात जामीन का मागत आहात? ही चांगली बाब नाहीये. या निर्णयावर आम आदमी पार्टीनं म्हटलं की, 'आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो. आता जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे.'

केजरीवाल यांच्यानंतर मनीष सिसोदिया हे आम आदमी पक्षातील सर्वात मोठे नेते आहेत. मनीष सिसोदिया यांच्याकडं दिल्ली सरकारमध्ये एकूण 33 पैकी 18 विभाग आहेत. सिसोदिया यांच्या अटकेनंतर त्यांचं काम कोण सांभाळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

केजरीवाल यांचे आणखी एक मंत्री सत्येंद्र जैन हे आधीच तुरुंगात आहेत. जैन यांच्या विभागांचं कामही सिसोदिया पाहत होते. सिसोदिया यांच्याकडं शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, वित्त, उत्पादन शुल्क, ऊर्जा, पाणी, आरोग्य अशी महत्त्वाची खाती होती. ते दिवसाला 12 ते 15 सभा घेत होते, असं त्यांचे सहकारी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant: कोणालाही अपेक्षा नव्हती! पदभार घेताच CJI सूर्यकांतांचा निर्णय देश चकित करणारा, सर्वात मोठी समस्या संपणार?

Nagpur News : 'दैनिक नवप्रभात'च्या संपादकांच्या घराला लक्ष्य; अवैध धंद्याला विरोध केल्याने दगडफेक, काचा फुटल्या...

सचिन पिळगावकर की अशोक सराफ! कोण जास्त श्रीमंत? संपत्तीत कोण आहे पुढे?

Farmer Success Story: 'धुमाळवाडीच्या द्राक्षांना आखाती देशात भाव'; फळबाग लागवडीत वृद्ध शेतकऱ्याची किमया, वर्षाकाठी ५० लाखांची कमाई !

Satara News: 'मद्यधुंद युवतीचा धिंगाणा': कऱ्हाड- चिपळूण रस्त्यावरील घटना; वाहनांच्या रांगा, नशा चडली अन्..

SCROLL FOR NEXT