Manmohan Singh 
देश

भाजपचं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांच्या 'फोडा आणि राज्य करा' तत्वाचं - मनमोहन सिंग

मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड असतं.

सकाळ डिजिटल टीम

पंजाब: पंजाबची (Punjab Assembly Election) निवडणूक जस-जशी जवळ येईल तशी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडणे सुरु झाले आहे. माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग (Former PM Manmohan Singh) यांनी देखील आज भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे. भाजपचं राष्ट्रीयत्व ब्रिटिशांच्या 'फोडा आणि राज्य करा' या तत्वाचं आहे. यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत अशी टीका मनमोहन सिंग यांनी केली आहे. पंजाबच्या जनतेला संबोधताना आज ते बोलत होते.

मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड असतं.

भाजपवर निशाणा साधताना मनमोहन सिंग म्हणाले, सरकारने समजून घेतले पाहिजे की, चेहरा बदलून आपली परिस्थिती बदलत नाही. सत्य काहीही असो ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात बाहेर येते. मोठमोठ्या गोष्टी बोलणं सोपं असतं पण ते प्रत्यक्षात आणणं खूप अवघड असतं असा टोलाही त्यांनी लगावला.

राजकारण्यांना मिठी मारून, किंवा आमंत्रण न देता बिर्याणी खायला गेल्याने नाती सुधारत नाहीत उलट यामुळे घटनात्मक संस्था कमकुवत होत आहेत. भाजपच्या (BJP) नेतृत्वाखालील सरकारला आर्थिक धोरणाचे आकलन नाही. हा प्रश्न केवळ राष्ट्रापुरता मर्यादित नाही. हे सरकार परराष्ट्र धोरणातही अपयशी ठरले आहे. चीन आमच्या सीमेवर बसला आहे आणि त्याला दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

काँग्रेसने (Congress) केलेल्या चांगल्या कामाची जनतेला जाण आहे. भाजपने मात्र पीएम मोदींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री आणि राज्यातील जनतेचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत आहेत तर गरीब लोक अधिक गरीब होत आहेत असा खेद मनमोहन सिंग यांनी व्यक्त केला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT