man-ki-baat 
देश

Mann Ki Baat: 100 कोटी लसीकरणानंतर देशात नवा उत्साह - PM मोदी

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'मन की बात'चा 82 वा कार्यक्रम केला आहे. देशात कोरोना लसीकरणाने गाठलेले 100 कोटींचे ध्येय तसेच येऊ घातलेल्या दिवाळीसहित अन्य सण-समारंभाच्या दरम्यान सावधानता बाळगण्याविषयी त्यांनी भाष्य केलं आहे. कोरोनासंदर्भातील नियमावलीचं पालन करण्याची आठवण देखील त्यांनी करुन दिली आहे तसेच भारताच्या ड्रोन पॉलिसीचे होणारे फायदे देखील मोदींनी देशवासीयांना सांगितले आहेत.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मला माझ्या देशातील लोकांच्या क्षमता ठाऊक आहेत. मला माहिती होतं की आपले आरोग्यसेवक देशवासीयांचे लसीकरण करण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत. आज 100 कोटी कोरोना लसीकरण पार पडल्यानंतर देश एका नव्या उर्जेने पुढे वाटचाल करत आहे. लसीकरण कार्यक्रमाची ही यशस्विता पाहून संपूर्ण जग भारताच्या क्षमतेकडे विस्मयतेने पाहत आहे.

ते म्हणाले की, आपण 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकात्मता दिवस म्हणून साजरा करतो. या दिवशी आपण किमान एका उपक्रमात तरी सहभागी झालंच पाहिजे.

ड्रोन पॉलिसीसंदर्भात बोलताना मोदी म्हणाले की, भारत सध्या ड्रोनचा वापर दळणवळणासाठी करत आहे. मग ते वस्तूंची ने-आण असो वा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठीची मदत असो, ड्रोनचा वापर केला जातो आहे. लवकरच, अशा अनेक उपयोगांसाठी ड्रोनचा वापर सुरु केला जाईल. कोरोना लसीच्या दळणवळणासाठी देखील ड्रोनचा वापर केला जातो आहे.

नवी ड्रोन पॉलिसी ही सध्याच्या तसेच भविष्यातील शक्यता लक्षात घेऊनच तयार केली आहे. या पॉलिसीच्या अंमलबजावणीनंतर अनेक परदेशी तसेच देशी स्टार्ट्स-अपनी ड्रोनमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स यांनी जवळपास 500 कोटी रुपयांहून अधिक रुपयांची ऑर्डर्स कंपन्यांना देऊ केल्या आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

ते म्हणाले की, पुढील महिन्यात भारत भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करणार आहे. त्यांचं आयुष्य आपल्याला अनेक गोष्टींची शिकवण देतं. स्वत:च्या संस्कृतीबद्दलचा अभिमान, पर्यावरणाविषयीच काळजी आणि अन्यायाविरोधातील लढा कसा द्यायचा, याचं नमुनेदार उदाहरण म्हणजे त्यांचं आयुष्य आहे. मी तरुणांना आवाहन करतो की त्यांनी त्यांच्याबद्दल अधिक वाचन करावं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT