Utpal Parrikar News Sakal
देश

भाजपकडून उत्पल पर्रीकरांचा गेम? पणजीतून तिकीट नाकारले

Goa Assembly Elections 2022: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) उमेदवारांची 38 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर Utpal Parrikar यांना पणजी मतदारसंघातून तिकीट नाकारले आहे.

सकाळ डिजिटल टीम

Goa Assembly Election: गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने (BJP) उमेदवारांची 38 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांचे नाव नाही. विशेष म्हणजे ज्या पणजी मतदारसंघासाठी उत्पल पर्रीकर इच्छूक होते, त्याठिकाणी आमदार राजेश पाडनेकर यांनाच भाजपने संधी दिली आहे. यामुळे भाजप उत्पल पर्रीकरांचा गेम तर करत नाहीना अशी चर्चा होत आहे. (Utpal Parrikar News)

दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांनी पणजी मतदारसंघातून (Panaji constituency) लढण्याची भुमिका मांडली होती. काहीही झाले तरी आपण पणजीतूनच लढणार असल्याचं त्यांनी म्हटले होते. भाजपने तिकीट नाकारल्यास आपण पणजीतून अपक्ष लढू असंही त्यांनी म्हटले होेते.

भाजपने उत्पल पर्रीकरांसमोर दोन पर्याय ठेवल्याचे देवेद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले. त्यापैकी एक म्हणजे राज्यसभेच्या माध्यमातून थेट केंद्रात जाणे किंवा पणजी सोडून दुसऱ्या एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवणे. पणजीमधून निवडून येण्याची ताकद नसल्याचे सांगत त्यांना दुसऱ्या एखाद्या सेफ मतदारसंघातून निवडणूक लढवा, असे त्यांना सांगण्यात आले होते. परंतू हे दोन्हीही पर्याय उत्पल पर्रीकरांनी नाकारल्याचं कळतंय. परंतू अजूनही उत्पल पर्रीकर यांनी आपली भुमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी मनोहर पर्रीकरांपुढे उमेदवार देणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे. (Utpal Parrikar News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT