Vanasthalipuram Police esakal
देश

धक्कादायक! अर्भकाचे लचके तोडून कुत्र्यानं डोकं केलं धडा वेगळं अन्..

सकाळ डिजिटल टीम

वनस्थलीपुरममधील सहारा कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आलीय.

हैदराबाद : वनस्थलीपुरममधील (Vanasthalipuram) सहारा कॉलनीत एक धक्कादायक घटना समोर आलीय. येथील रहिवाशांना काल (रविवार) भटक्या कुत्र्यानं जबड्यात बाळाचं डोकं पळवून नेत असल्याचं निदर्शनास आलं, हे पाहून त्यांना धक्का बसलाय. वनस्थलीपुरम पोलिसांनी (Vanasthalipuram police) सांगितलं की, सध्या बाळाचं डोकं ताब्यात घेतलं असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलंय. तसेच कलम 318 (देहाची गुप्त विल्हेवाट लावणं) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

काल (रविवार) मन्सूराबाद (Mansoorabad) येथील एका दूध बुथवर असलेल्या कार्तिकला भटक्या कुत्र्याच्या जबड्यात मानवी डोकं आढळून आलं. त्यानं इतर काहींना घेऊन कुत्र्याचा पाठलाग केला असता, ते डोकं कुत्र्याच्या तोंडातून झुडपात पडलं. याबाबत त्यांनी पोलिसांनी त्वरित माहिती कळवली.

त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता, हे डोकं दोन-तीन दिवसांच्या बाळाचं असल्याचं आढळून आलं. मात्र, या बाळाचं धड अद्याप सापडलेला नाहीय. मुलाच्या पालकांनी मृतदेह योग्यरित्या पुरला नसल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. या भटक्या कुत्र्यांनी बाळाचे लचके तोडून डोकं धडा वेगळं केलं असावं, असाही संशय व्यक्त केला जातोय. परंतु, खरी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी तपास केला जात आहे, असंही वनस्थलीपुरम पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय. कुत्र्याला बाळाचं डोकं कोठून सापडलं याबाबत सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT