Supreme Court of India Sakal
देश

Supreme Court : "बरेच न्यायाधीश आळशी, वेळेवर निकाल लिहित नाहीत"; निवृत्त न्यायाधीशांनी सुनावलं!

कोणत्याही लोकशाहीच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.

वैष्णवी कारंजकर

सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती जस्ती चेलमेश्वर यांनी मंगळवारी सांगितलं की, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करणारे कॉलेजियम अत्यंत अपारदर्शक पद्धतीने काम करते आणि न्यायाधीशांवरील आरोप समोर आल्यावर कोणतीही कारवाई करत नाही.

ते असंही म्हणाले की बरेच न्यायाधीश आळशी आहेत आणि वेळेवर निकाल लिहित नाहीत तर इतर बरेच अकार्यक्षम आहेत. "कॉलेजियमसमोर काही आरोप येऊ शकतात परंतु सहसा काहीही केले जात नाही. आरोप गंभीर असल्यास कारवाई केली पाहिजे. सामान्य उपाय म्हणजे फक्त न्यायाधीशांची बदली करणे... काही न्यायाधीश केवळ आळशी असतात आणि निकाल लिहिण्यासाठी वर्षानुवर्षे लावतात. काही न्यायाधीश अकार्यक्षम आहेत,"असंही चेलमेश्वर पुढे म्हणाले.

केरळ उच्च न्यायालयात भारतीय अभिभाषक परिषद केरळच्या वतीने आयोजित "संविधानासाठी कॉलेजियम बाहेरुन आलेलं आहे का?" या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात न्यायमूर्ती चेलमेश्वर उद्घाटनपर भाषण देत होते. निवृत्तीनंतर या विषयावर बोलल्याबद्दल त्यांच्यावर टीका आणि ऑनलाइन ट्रोलिंग होऊ शकते, असंही ते म्हणाले.

कोणत्याही लोकशाहीच्या अस्तित्वासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. "असं नसेल काय होईल याची फक्त कल्पना करा. एक पोलिस काय करू शकतो याची कल्पना करा. ते वाईट आहेत असं नाही परंतु त्यांच्याकडे शक्ती आहे आणि ते स्वतःसाठी कायदा बनू शकतात,"असंही चेलमेश्वर पु़ढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PG Medical Seats: वैद्यकीय पदव्युत्तर जागांमध्ये वाढ; राज्यात एक हजार ६६ जागांची भर; महाराष्ट्र देशात दुसऱ्यास्थानी

IND vs NZ 3rd ODI : भारतीय संघात मेहनतीवरून मूल्यांकन: नवोदित वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारची माहिती

Kolhapur News: गोकुळ अध्यक्ष निवडीसाठी ताकदीने उतरणार, महायुतीचा निर्धार; दिवाळी फराळाच्या निमित्ताने फार्महाउसवर बैठक

Maharashtra Live News : मुंबईकरांसाठी चिंताजनक बातमी, पाणीसाठ्यात घट, मनपाचं राज्य सरकारला पत्र

Diwali Air Pollution : दिवाळीत देशभरात वायुप्रदूषणाचा कहर ! 'हे' शहर सर्वाधिक प्रदुषित,दिल्लीची हवाही विषारी; मुंबई- पुण्याची काय स्थिती?

SCROLL FOR NEXT