sakal Podcast  E sakal
देश

Sakal Podcast : मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच ते फडणवीसांनी मागितली माफी

देशविदेशातील ८ महत्त्वाच्या घडामोडींची दखल सकाळ पॉडकास्टमध्ये घेतली जाते.

स्वाती केतकर-पंडित

आज सकाळ पॉडकास्टमध्ये काय ऐकाल?

राज्यात गेले २-४ दिवसांपासून मराठा आरक्षण आणि त्यासाठीचे आंदोलन चर्चेत आहे. आंदोलकांवर गोळीबार आणि लाठीहल्ला करण्यात आल्यानंतर पहिल्यांदाच राज्य सरकारने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह पत्रकार परिषद घेतली.

त्यावेळी मुख्यमंत्री काय म्हणालेत, हे ऐकणार आहोत.

तामिळनाडूमध्ये सनातन धर्माविषयी क्रीडा मंत्री उदयनिधी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन खळबळ माजली आहे.

निवडणुका जवळ आल्यावर बहुतेक सगळीकडेच मोफत वस्तू, धान्य, अनुदाने, सोयी दिल्या जातात. वस्तूंच्या किंमती कमी केल्या जातात, पण या सगळ्यामुळे राज्यांवरचा कर्जाचा बोजा प्रचंड वाढला आहे. त्याविषयी ऐकूया आजच्या तिसऱ्या बातमीत.

वेगवान घडामोडीत ऐकूया, लोकसभेसाठी कोल्हापूरात या उमेदवाराच्या नावाची चर्चा, राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला,

मराठी चित्रपटाचा नॉर्वे फेस्टिव्हलमध्ये डंका आणि इस्रोतील शास्त्रज्ञाचे निधन.

चर्चेतली बातमी आहे, देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची. जालन्यातील आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी गृहमंत्री म्हणून फडणवीसांना दोषी धरलं जात होतं.

आता देवेद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल माफी मागितली आहे. त्याविषयी ऐकणार आहोत चर्चेतल्या बातमीत.

...........................................................................................

१. मराठा आरक्षणाविषयी निर्णय नाहीच! मराठा समाजाने आरक्षणासाठी संयम राखण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा सल्ला

२. उदयनिधींच्या वादग्रस्त विधानावरून इंडिया आघाडीवर टीका, काँग्रेसची सारवासारव

३. निवडणुकीच्या तोंडावर राज्यांवर कर्जाचा बोजा

४. लोकसभेसाठी कोल्हापुरातून तगडा उमेदवार उतरणार रिंगणात

५. 'पोलिसांना दोष देऊ नका', राज ठाकरेंचा मराठा आंदोलकांना सल्ला

६. आर्या–डॉटर ऑफ भारत’ मराठी चित्रपटाचा नॉर्वे फेस्टिव्हलमध्ये डंका!

७. चांद्रयान-३ प्रक्षेपणावेळी काऊंटडाऊनमागचा 'तो' प्रसिद्ध आवाज हरपला; इस्त्रो शास्त्रज्ञाचे निधन

८. अखेर फडणवीसांनी मागितली माफी

............

स्क्रिप्ट आणि रिसर्च - स्वाती केतकर-पंडित, निलम पवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Buses Crash : गुजरातमधील सुरतमध्ये भीषण बस अपघात; महाराष्ट्रातील दोन बसेसची समोरासमोर जोरदार धडक, सहा जणांचा मृत्यू

MP Supriya Sule : गुन्हेगारी कमी झाल्याचे पत्र शहा-फडणवीसांना पाठवा! पोलिस आयुक्तांनी पाठविलेल्या पत्रावर सुप्रिया सुळे यांचा पोलीस आयुक्तांना टोला

Latest Marathi News Live Update : सुरतमध्ये दोन बसची धडक: 6 जणांचा मृत्यू

Monsoon: काही तास बाकी! लवकरच मान्सून केरळात धडकणार, राज्यात जोरदार पाऊस पडणार; हवामान विभागाचा इशारा

IPL 2026: RCB च्या विजयाच्या सेलिब्रेशनमध्ये विराटची भुवनेश्वर कुमारसोबत फुगडी; Viral Video ने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT