maratha arkshan 
देश

मराठा आरक्षण : 25 जानेवारी ऐवजी आजपासून सुनावणीस सुरवात; अंतरिम स्थगितीच्या निर्णयावर राज्याचं लक्ष

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती, मात्र या प्रकरणावरील सुनावणी आजच म्हणजे 20 जानेवारी रोजी लिस्ट झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. मराठा आरक्षणावरील आजची सुनावणी ही 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे. याआधी 11 तारखेला मराठा आरक्षणावर बाजू मांडण्यासाठी राज्य सरकारची आणि वकिलांची दिल्लीत बैठक झाली होती. 

मराठा आरक्षणावर सरकारने संपूर्ण तयारीनीशी न्यायालयीन लढाई लढावी. आम्ही तयारी केली आहे, असं मराठा मोर्चाचे समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी सुप्रीम कोर्टात गेल्या महिन्यात 9 डिसेंबरला सुनावणी झाली. त्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवण्यास नकार दिला. यामुळे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला झटका बसला. तसंच 25 जानेवारीपासून मराठा आरक्षणावर अखेरची सुनावणी सुरू केली जाईल, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं.

सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. यामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, एल. नागेश्वर राव, एस. अब्दुल नझीर, हेमंत गुप्ता आणि रविंद्र भट या न्यायमूर्तींचा या घटनापीठात समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT