maratha arkshan 
देश

मराठा आरक्षण : सर्व राज्यांना पाठवणार नोटीस; पुढील सुनावणी आता 15 मार्चला

सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावरील मॅरेथॉन सुनावणी आज पार पडली आहे. याआधी 5 फेब्रुवारीला झालेल्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने मॅरेथॉन सुनावणीबाबतचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. 8 मार्च ते 18 मार्च या दरम्यान ही मॅरेथॉन सुनावणी पार पडणार होती. मात्र, आजच्या सुनावणीत हे वेळापत्रक रद्दबातल ठरवण्यात आलं असून आता पुढील सुनावणी 15 मार्चला घेण्यात येणार आहे. या सुनावणीमधील महत्त्वाची बाब म्हणजे, आरक्षणाला 50 टक्क्यांहून अधिक परवानगी देता येईल का याविषयी इतर राज्यांची प्रतिक्रिया मिळवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने या राज्यांना नोटीसा पाठवण्याची सूचना दिली आहे. 

आजची सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. सुरवातीला मुकूल रोहतगी, कपिल सिब्बल यांनी युक्तीवाद केला की, आरक्षण हा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादीत नाही. इतर राज्यांना पक्षकार करा. ही राज्याची मागणी कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे. आरक्षण प्रकरणी सर्व  राज्यांना नोटीस पाठवण्याची विनंती कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे.  तमिळनाडूतील आरक्षण, EWS आरक्षण यासंदर्भात इतर राज्यांना सुद्धा आरक्षणासंदर्भात भुमिका मांडण्यासाठी नोटीस पाठवण्यात येणार आहे. मराठा आरक्षणासह एकत्रितपणे आरक्षणाबाबत विचार केला जाईल. इतर राज्यांशी मराठा आरक्षण जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाच न्यायाधीशांपेक्षा मोठ्या खंडपीठाच्या मागणीवर देखील निर्णय होणार. पुढील सुनावणीला कोणत्या मुद्यांवर चर्चा करायची याबाबत चर्चा झाली.

आधी ठरवलेल्या वेळापत्रकानुसार आता सुनावणी होणार नाहीये. 8 ते 18 मार्च दरम्यान मॅरेथॉन सुनावणी होणार होती. मात्र आता पुढील सुनावणी 15 मार्च रोजी होणार असल्याची माहिती मिळत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Pune University Fake Degree: पुणे विद्यापीठातील बनावट बी.कॉम. पदवी प्रकरणात कर्मचारी रमेश मुखेकर ४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत

Pune Voter List Revision: पुण्यात मतदार यादी पुनरीक्षणाचे फक्त ५५ टक्के काम; आठ दिवसांत उर्वरित ४५ टक्के पूर्ण करण्याचे प्रशासनास आव्हान

Vande Mataram: ''राजेंद्र प्रसाद यांनी मोठी चूक केलेली'', वंदे मातरम् बिल मंजूर झाल्यानंतर खासदार ओवैसींचं वादग्रस्त विधान

Balen Shah: पंतप्रधान बालेन शाह घटनात्मक परंपरा मोडत आहेत! नेमके आरोप काय? नेपाळच्या राजकारणात नवा वाद

SCROLL FOR NEXT